Colors Marathi : मतदान जनजागृतीसाठी कलर्स मराठीच्या लोगोमध्ये बदल 

नुकतेच कलर्स मराठीच्या कलाकारांनी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरून विविध व्हिडिओंद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

0
Colours Marathi
Colours Marathi

नगर : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना कलर्स मराठी वाहिनीने नुकताच आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब लोगोमध्ये बदल (Logo Change) केलेला दिसत आहे. बदललेल्या या नव्या लोगोमध्ये एका बोटावर शाई लागलेली दिसते, ज्यामुळे मत दिल्याचे सूचित होत आहे.

मागील काही वर्षात मतदानाचा टक्का फार कमी झाला आहे. या नव्या लोगोच्या बदलामुळे लोकांमध्ये मतदानाचे महत्त्व आणि एका स्थिर देशासाठी मतदानाची असलेली आवश्यकता याबद्दल जागरूकता(Voting Awareness) निर्माण करण्याचा कलर्स मराठीचा उद्देश आहे.

नक्की वाचा : ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी सार्वजनिक जीवनात राहण्यास पात्र नसेल’- मोदी

‘आपल्या एका मताने देशाचे कल्याण होईल’ (Colours Marathi)

कलर्स मराठीने नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात आपले योगदान दिले आहे. नुकतेच कलर्स मराठीच्या कलाकारांनी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरून विविध व्हिडिओंद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान करण्यासाठी बाहेर या, वोटिंग करणे हा तुमचा हक्क आणि जबाबदारी आहे. देशासाठी एक पाऊल उचलून मतदान करा. आपल्या एका मताने देशाचे कल्याण होईल. मतदार हे टीव्ही आणि सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात करतात, हीच गोष्ट लक्षात घेऊन कलर्स मराठीने हे स्तुत्य पाऊल उचलले आहे. 

अवश्य वाचा : गाझा युद्धात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण; कर्नल वैभव काळे यांचा हल्ल्यात मृत्यू

कलर्स मराठीने केलेला हा बदल प्रेक्षकांना मतदान करण्याची प्रेरणा देईल.  त्यांना मतदान करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करेल. कारण मतदान हीच आपली ताकद, हीच आपली जबाबदारी आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here