Communist Party of India : भेंडे येथे ‘कम्युनिस्ट’चा रास्तारोको 

Communist Party of India : भेंडे येथे ‘कम्युनिस्ट’चा रास्तारोको 

0
Communist Party of India : भेंडे येथे ‘कम्युनिस्ट’चा रास्तारोको 
Communist Party of India : भेंडे येथे ‘कम्युनिस्ट’चा रास्तारोको 

Communist Party of India : नेवासे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी (Farmer Loan Waiver) करावी तसेच नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पुरग्रस्तांना हेक्टरी ७० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी नेवासे तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष (Communist Party of India)भारतीय किसान सभेने (AIKS) भेंडे बसस्थानक चौकात रास्तारोको आंदोलन केले.

नक्की वाचा : “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार

यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. बन्सी सातपुते, भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव  कॉ. आप्पासाहेब  वाबळे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका सचिव कॉ. भारत आरगडे यांच्या नेतृत्वाखाली आज (ता. १०) करण्यात आलेल्या या रास्तारोको आंदोलनात स्वप्निल गरड, अशोक साळवे, लक्ष्मण आरगडे, भीमराज आगळे, रावण घाडगे, उत्तम थोरात, पांडुरंग शिरोळे, तुकाराम शिंदे, ऋषिकेश नजन, विजू आढागळे, नितीन साळवे, रोहित गोंडे, रोहन साळवे, विकास सातपुते, विजय आढगळे सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या नावे नेवासा तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक मनोज आहिरे व ग्राम महसूल अधिकारी विजय काळे यांनी निवेदन स्वीकारले. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी ही आंदोलन स्थळी भेट दिली. 

Communist Party of India : भेंडे येथे ‘कम्युनिस्ट’चा रास्तारोको 
Communist Party of India : भेंडे येथे ‘कम्युनिस्ट’चा रास्तारोको 

अवश्य वाचा : परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा : बन्सी सातपुते (Communist Party of India)

राज्यातील मराठवाडा,अहिल्यानगर व इतर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी व इतर जनतेची प्रचंड हाल व आर्थिक नुकसान झालेले आहे. सरकारने जाहिर केलेली मदत ही अगदी तुटपुंजी आहे. बागायती क्षेत्राला ३५० रुपये गुंठा व हंगामी बागायत क्षेत्र व कोरडवाहू क्षेत्राला १७० रुपये प्रति गुंठा ही नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्यांची व नुकसानग्रस्तांची चेष्टा आहे. पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रुपये नुकसान भरपाई  मिळावी व संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी कॉम्रेड बन्सी सातपुते यांनी केली.