Congress : सायबर कॅफेचालकाने बुरुज हलवला; यंदा काँग्रेसच्या वर्चस्वाला शिवसेनेने सुरुंग लावला

Congress : सायबर कॅफेचालकाने बुरुज हलवला; यंदा काँग्रेसच्या वर्चस्वाला शिवसेनेने सुरुंग लावला

0
Congress : सायबर कॅफेचालकाने बुरुज हलवला; यंदा काँग्रेसच्या वर्चस्वाला शिवसेनेने सुरुंग लावला
Congress : सायबर कॅफेचालकाने बुरुज हलवला; यंदा काँग्रेसच्या वर्चस्वाला शिवसेनेने सुरुंग लावला

Congress : संगमनेर : महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण, महिलांना एसटी प्रवासात सवलत, वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांचा वर्षाव, शेतकर्यांना कृषी पंपाची वीज बिल माफी, कापूस, सोयाबीनसाठीच्या भावांतर योजना अशा लोकाभिमुख निर्णय आणि बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणा याची जादू चालली आहे असं दिसून येतं आहे. त्यामुळे मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत राज्यात अनेक दिग्गजांचा पराभव झाला. आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांनी कॉंग्रेसचे (Congress) जेष्ठ नेते माजी आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा दारूण पराभव करत संगमनेर विधानसभेत इतिहास घडवला. एका सायबर कॅफेचालकाने चाळीस वर्षाचा बुरुज हलवला. शिवसेनेने (Shiv Sena) यंदा काँग्रेसच्या वर्चस्वाला शिवसेनेने सुरुंग लावला आहे.

नक्की वाचा : ‘आमचं आम्ही बघू’,मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांचं वक्तव्य

चार दशके बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता

गेल्या चार दशके बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभेत एकहाती सत्ता उपभोगली. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास ते मुख्यमंत्रिपदाचेही प्रमुख दावेदार मानले जात होते. सहकाराचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड राहिली आहे. नगर जिल्ह्यातील राजकारण हे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दिग्गज घराण्यांच्या भोवती फिरत आले आहे. दोन्ही घराण्यांचे सहकार चळवळीत मोठे योगदान आहे. सुजय विखे यांच्या रेट्यानंतर संगमनेर विधानसभेची जागा महायुतीत भाजपकडे येईल, असे चित्र असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ही जागा गेली. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात युवा कार्यकर्ते अमोल खताळ यांना शिवसेनेने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. खताळ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक, भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला, परंतु त्याआधीच त्यांची उमेदवारीही घोषित झाली होती.

पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे ठरले खताळ जायंट किलर (Congress)

2019 मध्ये काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांना उमेदवार म्हणून उभे होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या साहेबराव रामचंद्र नवले यांना पराभूत करत विजय मिळवला. बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 25 हजार 380 मतं मिळाली होती, तर साहेबराव रामचंद्र यांना 63 हजार 128 मतं मिळाली होती. त्या वेळी काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवला होता आणि शिवसेनेच्या उमेदवाराची तुलना केली तर काँग्रेसला साधारणतः दुप्पट मतं मिळाली होती. 2014 मध्येही काँग्रेसचे बाळासाहेब थोरातच येथे निवडणुकीत उभे होते. त्यावेळी त्यांचा सामना शिवसेनेच्या जनार्दन आहेर यांच्याशी झाला होता. त्या निवडणुकीतही थोरात यांनी शिवसेना उमेदवाराच्या तुलनेत साधारणतः दुप्पट मतांमध्ये विजय मिळवला होता. संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे, तिथे काँग्रेसने बराच काळ विजय मिळवला आहे. नवव्या वेळेस संगमनेर विधानसभेत निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या थोरातांचा एका नवख्या तरूणाने दारूण पराभव केलाय. त्यामुळे पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ जायंट किलर ठरले. विखे पिता पुत्रांनी मोठी ताकद लावत बाळासाहेब थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावलाय. विखेंच्या नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेमुळे आणि निवडणूक हलक्यात घेणं थोरातांना महागात पडलंय. एक साधारण कॉम्प्युटर सेंटर चालक तरुणाने अनेक वर्ष मंत्री राहिलेल्या दिग्गज नेत्याला धोबीपछाड दिल्याने अमोल खताळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Congress : सायबर कॅफेचालकाने बुरुज हलवला; यंदा काँग्रेसच्या वर्चस्वाला शिवसेनेने सुरुंग लावला
Congress : सायबर कॅफेचालकाने बुरुज हलवला; यंदा काँग्रेसच्या वर्चस्वाला शिवसेनेने सुरुंग लावला

अमोल धोंडीबा खताळ पाटील वय ४१ वर्ष यांचा जन्म संगमनेर येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. अमोल यांचे शिक्षण – बी. कॉम शिक्षण पूर्ण करून सुरूवातीला स्वतःचे कम्प्युटर सेंटर सुरू केले. नंतर जमीन खरेदी-विक्री तसेच २५०० सभासद असलेल्या फार्मा प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर आहे. शिक्षण सुरू असतानाच २००१ साली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पासून त्यांनी आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक पद भूषविली. अमोल २०१७ पासून भाजापात होते आणि संगमनेर येथील भ्रष्टाचार दादागिरी आणि राजकीय दहशतीच्या विरोधात उभा राहणारा व्यक्ती एक कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा चेहरा म्हणून त्यांची ओळख झाली. तसेच विखे पाटलांचे निकटवर्तीय आहे. संगमनेर हा जिल्हा होण्यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये सर्वाधिक सक्रिय होते. जवळपास चार महिने हे आंदोलन सुरू होते त्यामध्ये पावणेदोन लाख लोकांना सहभागी करून त्यांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम चालवली. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून १६ हजार लोकांना जोडले. अमोल यांचे वडील धोंडीबा आणि आई विठाबाई खताळ शेतकरी आहे. अमोल यांच्या पत्नी निलम खताळ गृहिणी आहे.

अमोल यांचे संगमनेर येथे सामाजिक राजकिय क्षेत्रात योगदान असून गोरगरिबांची जाण असणारा व्यक्ती म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. २००१ -२०१६ :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका स्तरापासून सुरुवात करत महाराष्ट्र प्रदेश सचिव, महासचिव पदापर्यंत यशस्वी मजल २००९-२०१६ :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष २०११-२०१६:-दिल्ली, बिहार, गोवा, मुंबई आणि छत्तीसगडचे प्रभारी, २०११-२०१६:- दिल्ली कार्यालय विद्यार्थी संघटनेचे प्रभारी, २०१७-२०२३:- भाजपा पक्षामध्ये सक्रिय, २०२३:- अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती, संगमनेर, २०२४:- सध्या जबाबदारी संगमनेर विधानसभा प्रमुख भारतीय जनता पार्टी- २०२४:- शिवसेना पक्ष प्रवेश आणि आमदार