Congress : भाजी व फळविक्रेत्यांवरील कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक

Congress : भाजी व फळविक्रेत्यांवरील कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक

0
Congress : भाजी व फळविक्रेत्यांवरील कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक
Congress : भाजी व फळविक्रेत्यांवरील कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक

Congress : नगर : अहिल्यानगर महापालिकेने (AMC) शहरातील अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, या कारवाईत भाजी व फळविक्रेत्यांवर कारवाई (Action on Vegetable and Fruit Sellers) करण्यात येते. हातावर पोट असलेल्या या व्यावसायिकांवर कारवाई करू नये या मागणीचे निवेदन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीचे महासचिव इमरान बागवान यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिका आयुक्तांना आज (ता. १७) देण्यात आले.

नक्की वाचा : आंबेडकरवादी समाजाची कचेरीसमोर निदर्शने; परभणी घटनेचा केला निषेध

निवेदनात म्हटले आहे की,

वाडिया पार्क व माळीवाडा बस स्थानकाजवळील फळ व भाजी विक्रेत्यांवर महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करत आहे. भाजी व फळ विक्रेते हे गरीब कुटुंबातील आहेत. त्यांचा माल अतिक्रमण पथक ताब्यात घेते. त्यामुळे गरिबांना मोठी आर्थिक हानी होत आहे. महापालिका प्रशासनाने या गरीब फळ व भाजी विक्रेत्यांवर कारवाई करू नये. अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इमरान बागवान यांनी निवेदनातून दिला आहे.

अवश्य वाचा : शहरातील ९० हजार मालमत्तांवर लावले ‘क्यूआर कोड’; अहिल्यानगर महापालिकेचा उपक्रम

निवेदन देताना आदी उपस्थित (Congress)

निवेदन देताना रामदास बेद्रे, रफीक बागवान, गोरख बोरूडे, इम्रान पठाण, जावेद बागवान, गफार शेख, सुरेश घोलप, सिकंदर बागवान, रईस शेख, गणेश मोरे, कलीम शेख, चांद बागवान आदी उपस्थित होते.