Congress : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Congress : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
Congress : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Congress : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Congress : श्रीरामपूर : शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला धक्का बसला असून भारतीय जनता पार्टी (BJP) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नगरसेवक आणि शहराध्यक्षांनी काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे.

अवश्य वाचा : भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!

यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

नगरसेवक शामलिंग शिंदे, गटनेते राजेंद्र पवार, रईस जहागिरदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे, नगरसेविका प्रणिती दिपक चव्हाण, मर्चंटचे संचालक दत्तात्रय धालपे, योगेश जाधव, निलेश बोरावके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी युवा नेते करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, सभापती सुधीर नवले, अंजुम शेख, मुज्जफर शेख, मुन्ना पठाण, रितेश रोटे, कलीम कुरेशी, के.सी शेळके, निलेश नागले, रज्जक पठाण, नाजिरभाई व्यासपीठावर उपस्थित होते.

नक्की वाचा : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

माजी आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, (Congress)

श्रीरामपूरची जनता स्वाभिमानी असून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल. स्व. जयंतराव ससाणे यांच्या कार्यकाळात श्रीरामपूर नगरपरिषदेचा नावलौकिक हा राज्यात होता. मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाले. तो श्रीरामपूरसाठी सुवर्णकाळ होता. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांना ते देखवले नाही. त्यांनी श्रीरामपूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभा निवडणुकीच्यावेळी श्रीरामपूरकरांनी आमदार हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणत त्यांना धडा शिकवला. त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत श्रीरामपूर नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार हेमंत ओगले यांनी यावेळी काँग्रेस पक्षात सगळ्यांचे स्वागत केले व येणाऱ्या काळात स्व. ससाणे साहेबांप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन काम करु असे सांगितले. करण ससाणे म्हणाले की, आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपले आभारी आहे. येत्या काळात बरोबरीने काम करु. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी केले. तर आभार राजेंद्र पवार यांनी मानले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.