Congress : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध ; दोषींवर कारवाईची मागणी

Congress : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध ; दोषींवर कारवाईची मागणी

0
Congress : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध ; दोषींवर कारवाईची मागणी
Congress : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध ; दोषींवर कारवाईची मागणी

Congress : राहाता : काँग्रेस पक्षाचे (Congress) अधिकृत प्रवक्ते हनुमंत पवार (Hanumant Pawar) यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राहाता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police Station) निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोकशाही व्यवस्थेत वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक असले तरी त्या मतभेदांना उत्तर देण्यासाठी हिंसा, दडपशाही किंवा गुंडगिरीचा मार्ग स्वीकारणे अत्यंत निंदनीय आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यात २० लाख नागरिकांना पाच लाखांचे आरोग्यकवच  

लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी

अशा प्रकारच्या घटना या केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात करणाऱ्या आहेत. या प्रकरणामागे राजकीय द्वेषातून प्रेरित काही गुंड प्रवृत्तीच्या घटकांचा हात असल्याची जनतेत तीव्र भावना असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन राहाता पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी यांना देण्यात आले. यावेळी राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे यांनी दोषींवर कठोर कारवाई करून लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली. लढवय्ये हनुमंत पवार यांच्यासोबत काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अवश्य वाचा : गोळी लागली तरीही तो थांबला नाही,आर्मी डॉग टायसनच्या शौर्याची थरारक कहाणी!  

लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार (Congress)

शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी करण्यासारखे आहे. अशा भ्याड कृत्यांना काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”या प्रसंगी उत्तमराव मते, ज्ञानेश्वर वर्पे, राजेंद्र निर्मळ, अमोल आरणे, मुन्नाभाई फिटर, अनिश शेख आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.