Congress : पाथर्डीत काँग्रेस सृजन अभियानाला प्रारंभ; संघटन बळकटीकरणावर भर

Congress : पाथर्डीत काँग्रेस सृजन अभियानाला प्रारंभ; संघटन बळकटीकरणावर भर

0
Congress : पाथर्डीत काँग्रेस सृजन अभियानाला प्रारंभ; संघटन बळकटीकरणावर भर
Congress : पाथर्डीत काँग्रेस सृजन अभियानाला प्रारंभ; संघटन बळकटीकरणावर भर

तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देणारे काँग्रेसचे सृजन अभियान सुरू; सरत राऊत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

Congress : पाथर्डी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (All India Congress Committee) आदेशानुसार पाथर्डी येथे काँग्रेस (Congress) पक्षाच्या संघटन सृजन अभियानाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. ओरिसाचे माजी मंत्री सरत राऊत (Sarat Raut) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा समन्वयक किरण पाटील, जिल्हा सचिव ज्ञानदेव वाफारे, तालुका अध्यक्ष नासिर शेख, जालींदर काटे, पोपट बडे, सुनील दौंड, नवाब शेख, रोहिदास खेडकर, जुनेद पठाण, शुभम गर्जे, प्रशांत मगर, सुभाष कोलते, संपत क्षेत्रे, कय्युम शेख, भाऊसाहेब गोसावी, मुन्ना खलिफा, युसुफ खान, जब्बार आतार, सादिक सय्यद, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

नक्की वाचा : हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली

यावेळी बोलताना राऊत म्हणाले,

काँग्रेस पक्षाची गौरवशाली परंपरेचा असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि जडणघडणीतील पक्षाच्या योगदान आपल्याला विसरता येणार नाही. आज देशाला काँग्रेस पक्षाची नितांत गरज असून, संघटन मजबूत करण्यासाठी सृजन अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देणे आणि निष्क्रिय नेतृत्वाला सन्मानाने बाजूला करण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’मुळे पक्षाचा तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क वाढला असून त्याचाच पुढचा टप्पा म्हणून हे अभियान राबविण्यात येत आहे. लवकरच पाथर्डी तालुक्यातील कार्याचा अहवाल राहुल गांधी यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तालुका काँग्रेस अध्यक्ष नासिर शेख म्हणाले,(Congress)

यावेळी हे अभियान प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय देणारे असून पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे. आगामी काळात जिल्हाध्यक्ष पदासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून सक्षम नेतृत्वाची निवड होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, ग्राम व बूथ स्तरावर संघटन अधिक मजबूत करून आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष गतवैभव प्राप्त करेल.कार्यक्रमास  दत्तात्रय केदार, ज्ञानदेव खेडकर, भारत देवढे, दीपक देशमुख, मुरलीधर बोरुडे, कदिर शेख, भीमराव फुंदे, योगेश ढाकणे, विनायक ढाकणे, तुषार ढाकणे, विवेक ढाकणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.