Congress : संगमनेर : मूठभर लोकांनी स्वत:च्या फायद्याकरिता काँग्रेस (Congress) पक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे गहाण ठेवला आहे, असा गंभीर आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला. काँग्रेसमधील काही नेते स्वत:चे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
अवश्य वाचा: मांजरीचा जीव वाचवताना विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू
माध्यमांशी बोलतांना काँग्रेसवर टीका
बुथ सक्षमीकरण अभियानाच्या निमित्ताने तालुक्यातील आश्वी बुद्रुक, उमरी बाळापूर येथे मंत्री विखे पाटील यांनी बुथ प्रमुख तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ज्या ठिकाणी पक्षाचे प्राबल्य आहे, अशा जागा सोडून द्यायचा स्वत:च्या फायद्यासाठी नको तिथे उमेदवार देण्याचे काम राज्यातील काँग्रेसी नेत्यांनी केले असल्याकडे लक्ष वेधून, बाळासाहेब थोरात स्वत:ला ज्येष्ठ नेते समजतात. पण थोरातांची आता किव येते कारण त्यांना स्वत:च्या जिल्ह्यात एकही जागा मिळवता आली नाही.
हे देखील वाचा: ‘संपदा पतसंस्था’ घोटाळा प्रकरण; पाच आरोपींना जन्मठेप
थोरातांनी काय काम केले? (Congress)
उत्तर महाराष्ट्रात ८ जागा असताना तिथे ही काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यामुळे थोरातांनी काय काम केले? असा सवाल विखे पाटील यांनी केला. नगर जिल्ह्यात काँग्रेसला का जागा मिळाली नाही, याची कारणे लोकांना आणि कार्यकर्त्यांना थोरातांनी सांगितली पाहिजेत, असे थेट आव्हान देऊन सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणाऱ्या थोरातांनी स्वत:च्या नगर जिल्ह्यात पक्षाचे काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी थोरातांना दिला.