Congress : काॅंग्रेसच्या ‘त्या’ सात बंडखाेर आमदारांना क्राॅस वाेटिंग भाेवणार; सहा वर्षांसाठी निलंबन हाेण्याची शक्यता

Congress : काॅंग्रेसच्या 'त्या' सात बंडखाेर आमदारांना क्राॅस वाेटिंग भाेवणार; सहा वर्षांसाठी निलंबन हाेण्याची शक्यता

0
Congress : काॅंग्रेसच्या 'त्या' सात बंडखाेर आमदारांना क्राॅस वाेटिंग भाेवणार; सहा वर्षांसाठी निलंबन हाेण्याची शक्यता
Congress : काॅंग्रेसच्या 'त्या' सात बंडखाेर आमदारांना क्राॅस वाेटिंग भाेवणार; सहा वर्षांसाठी निलंबन हाेण्याची शक्यता

Congress : नगर : काँग्रेसच्या (Congress) सात आमदारांची नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Elections) मते फुटल्याने शेकापचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना पराभवाचा सामना करावा लागला. या बंडखोरीनंतर काँग्रेस हायकमांडने कठोर निर्णय घेण्याची तयारी केली आहे. आज दिल्लीमध्ये या संदर्भात बैठक होत असून क्रॉस वोटिंग करणाऱ्या त्या सात आमदारांना पक्षातून निलंबित केले जाण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा: महाराष्ट्राला स्वाभिमानाची परंपरा – संजय राऊत

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर

विधानपरिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली. काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार असल्याने महाविकास आघाडीची मुख्य मदार त्यांच्यावर होती. मात्र, काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षाचा व्हीप डावलून कॉस वोटिंग केले. ज्यामुळे शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसमधील या गटबाजीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा: जिओ,एअरटेलला धक्का; टाटा आणि बीएसएनएलमध्ये मोठा करार

६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता (Congress)

आज दिल्लीमध्ये या संदर्भात महत्त्वाची बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यामध्ये बैठक होणार असून सात काँग्रेस आमदारांना निलंबित करण्यावर अंतिम निर्णय होणार असून सात आमदारांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here