Congress : आरक्षणासंदर्भातील खोटेपणा उघड; मंत्री विखे पाटलांची काँग्रेसवर टीका 

Congress : आरक्षणासंदर्भातील खोटेपणा उघड; मंत्री विखे पाटलांची काँग्रेसवर टीका 

0
Congress : आरक्षणासंदर्भातील खोटेपणा उघड; मंत्री विखे पाटलांची काँग्रेसवर टीका 
Congress : आरक्षणासंदर्भातील खोटेपणा उघड; मंत्री विखे पाटलांची काँग्रेसवर टीका 

Congress : नगर : विरोधी पक्षनेते (Opposition Leader) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य केले. हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करणारे आहे. त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा (Congress) आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांसमोर उघड झाला आहे, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.

नक्की वाचा: डीजे मुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी होतेय : आमदार तांबे

माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले,

”परदेशात गेल्यानंतर राहुल गांधींवर तिथल्या वातावरणाचा परिणाम होतो. त्यातून असे वक्तव्य करण्याचे शहाणपण त्यांना सूचत असल्याचा टोला लगावला. गांधींना परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळविण्याची हौस आहे. पण आपण काय बोलतो याचे भानही त्यांना राहात नाही. यापूर्वी संसदेत त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या कालावधीतील अध्यादेश फाडण्याची राहुल गांधी यांची भूमिका म्हणजे संविधानाचा अपमान करणारीच होती,” असा आरोप त्यांनी केला.

अवश्य वाचा: पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करा; आयुक्तांचे आवाहन

काँग्रेसची दुताेंडी भूमिका (Congress)

आता थेट आरक्षण रद्द करण्याच्या त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसची दुतोंडी भूमिका उघड झाली आहे. लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह पसरवून दिशाभूल करणारे चेहरे  जनतेला समजले असल्याकडे लक्ष वेधून राहुल गांधीचे वक्तव्य जनतेचा हक्क हिरावून घेणारे आहे. त्यांच्या वक्तव्याचा मंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

आरक्षण रद्द हाेऊ देणार नाही
काँग्रेसने नेहमीच संविधनाचा अपमान केला. त्यामुळे राहूल गांधीची भाषा आणि काँग्रेसची आरक्षणाच्या बाबतीतची भूमिका संविधान बदलाची असल्याचे आता लपून राहिलेले नाही. भारतीय जनता पक्षाने नेहमीच संविधानाचा आदर केला. आरक्षण रद्द होऊ देणार नाही, असे विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.