Assembly Election: विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर!

रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

0
Nana Patole
Nana Patole

नगर : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election Result) निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेचं हे वादळ थांबताच राज्यात विधान परिषदेच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळाले आहे. प्रत्येक पक्ष आता विधानसभेसाठी आपला उमेदवार जाहीर करत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने देखील (Congress Candidate) उमेदवार जाहीर केले आहे.

नक्की वाचा : नगर जिल्ह्यावर महाविकास आघाडीचे वर्चस्व

विधान परिषदेवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस (Assembly Election)

आगामी विधान परिषदेवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस रंगली आहे. मनसेने कोकण पदवीधरमधून आपला उमेदवार जाहीर केलाय. अशातच आता काँग्रेसनंही विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेसनं विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली. राज्यातील लोकसभा निवडणुका गाजवल्यानंतर काँग्रेसनं आता विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसनं आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. सोमवारी (ता.३) रमेश कीर यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ काँग्रेस नेते आबा दळवी, राजेश शर्मा, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम गोकुळ शेठ पाटील उपस्थित होते.

अवश्य वाचा : विद्यार्थ्यांच्या शाळेतील प्रवास उलगडणार ‘बंटी बंडलबाज’ चित्रपटातून

कशी पार पडणार विधान परिषदेची निवडणूक ? (Assembly Election)

विधान परिषदांच्या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. सात जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी १० जून रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जून आहे. २६ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया ५ जुलै रोजी पूर्ण होणार आहे. संबंधित मतदारसंघात आचारसंहिता लागू झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here