Constitution : नगर : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) विरोधी इंडिया आघाडीने (India Alliance) एन डी ए सरकार संविधान (Constitution) बदलणार असा अप्रचार केला. तो केवळ जनतेची दिशाभूल करणारा स्टंट होता. त्यामुळे संविधानाच्या सन्मानार्थ नगर शहरात जिल्हाव्यापी संविधान सन्मान मेळाव्याचे २ सप्टेंबर रोजी नगर शहरातील सहकार सभागृह या ठिकाणी दुपारी चार वाजता आयोजित केले असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे तसेच निमंत्रक सुमेध गायकवाड व अजय साळवे यांनी दिली.
नक्की वाचा: बनावट सोन्याचे बिस्कीट देत फसवणूक करणारा गजाआड
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा नागरी सत्कार
या संविधान सन्मान महामेळावामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार तसेच नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र शिवाजी गर्जे यांची विधान परिषदेच्या नामदारपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे आदीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अवश्य वाचा: दीपक केसरकरांच्या वक्तव्यावरून संजय राऊत भडकले; म्हणाले …
कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन (Constitution)
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शहराचे आमदार संग्राम जगताप हे असणार आहे. त्यामुळे या मेळाव्याला जास्तीत जास्त फुले, शाहू, आंबेडकर व साठे चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून भीमशक्तीचे विराट दर्शन घडवावे, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, विजयराव वाकचौरे, प्रा.जयंत गायकवाड, सुनील साळवे, किरण दाभाडे, नितीन कसबेकर, संपतराव भारुड, राजाभाऊ कापसे आदींनी केले आहे.