Constitution : नगर : अखंड भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) सी.डी.देशमुख लॉ कॉलेज (केडगाव, ता. जि. अहिल्यानगर) यांच्यातर्फे महाराष्ट्रामधील सैनिक चळवळीतील अग्रगण्य सैनिक संस्था जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (महाराष्ट्र) यांच्या पदाधिकाऱ्यांना कॉलेज प्रांगणामधील ध्वज वंदनासाठी आमंत्रित केलेले होते. यावेळी संविधान (Constitution) व सन्मानपत्र देऊन माजी सैनिकांचा (Ex-Servicemen) महासन्मान करण्यात आला.
नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पुन्हा लांबणीवर
माजी सैनिकांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन
जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी यांचे सी.डी. देशमुख लॉ कॉलेजचे संस्थापक माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वतीने संस्थेचे संचालक प्रा.ना.म. साठे व प्राचार्य सारंग घनबोटे यांनी पुष्पगुच्छ देऊन येथे स्वागत केले. उपस्थित सैनिक संस्थेच्या माजी सैनिकांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन केले. यानंतर मान्यवरांचे भाषण झाले. अखंड भारतामधील आगळावेगळा सन्मान म्हणून विधी कॉलेजच्या वतीने पहिल्यांदाच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाजीराव दरेकर मेजर यांनी शैक्षणिक व अध्यात्माची सांगड घालून येणाऱ्या समस्याचे समाधान करण्याचे आवाहन केले.
अवश्य वाचा : ‘ती’ च्या अवयवदानातून तिघांना ‘पुनर्जन्म’
मेजर निलकंठ उल्हारे यांनी केले मोलाचे मार्गदर्शन (Constitution)
प्रमुख पाहुण्यांतर्फे मेजर निलकंठ उल्हारे यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत भारतीय सीमेवर दुश्मनांबरोबर अंगावर शहारे येणारे चित्तथरारक विस्मरणीय अनेक चकमकी बद्दल अनुभव सांगितले. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये एक नवी चेतना निर्माण झाली. कायदा व सुव्यवस्था बद्दल अनेक समस्याचे समाधान कसे करता येईल याबद्दल विस्तृत माहिती दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून मेजर निळकंठ उल्हारे ,रघुनाथ दांगट मेजर ,नामदेव शिंदे मेजर, जिल्हाध्यक्ष बाजीराव दरेकर मेजर, लहू सुलाखे मेजर व संघर्षनामा मल्टीमीडियाचे मुख्यसंपादक मेजर भिमराव उल्हारे होते. उपस्थित कॉलेज लॉ कॉलेज स्टॉप संचालक ना.म. साठे, प्राचार्य सारंग गणगोटे, ऋषिकेश थोरात, कवादसर, बेगसर, सिद्धी मोबरकर, सचिन तरटे ,आबासाहेब थोरात, सविता तांबे, प्रवीण शेलार, दळवी मॅडम, अश्विनी सोनवणे, फ्रॉल्कनीर शेक्सपियर, विजय आगळे, विकास सातपुते, मोनाली धिवर, रंजना गगे,हर्षवर्धन गायकवाड व महेश वाळके आदी उपस्थित होते.