Constitution Day : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

Constitution Day : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

0
Constitution Day : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा
Constitution Day : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

Constitution Day : नगर : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त (Constitution Day) आज प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन व शपथविधी कार्यक्रम उत्साहात पार पडला. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते (Dadasaheb Gite) यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारतीय संविधानाची शपथ दिली व लोकशाही मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.

नक्की वाचा : मानवावर हल्ला करणारे २३ बिबटे जेरबंद; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई

अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित (Constitution Day)

कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दत्तात्रय कवित्वके, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, तहसीलदार योगेश शिंदे व नागेश गायकवाड, नायब तहसीलदार किरण देवतरसे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक सुरेश आघाव यांच्यासह विविध शाखांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, मूलभूत अधिकार व कर्तव्ये, प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अवश्य वाचा : शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज द्या ; शेतकऱ्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन