Construction Worker : बांधकाम मजुरांचे पंचायत समितीत ठिय्या आंदोलन

Construction Worker : बांधकाम मजुरांचे पंचायत समितीत ठिय्या आंदोलन

0
Construction Worker : बांधकाम मजुरांचे पंचायत समितीत ठिय्या आंदोलन
Construction Worker : बांधकाम मजुरांचे पंचायत समितीत ठिय्या आंदोलन

Construction Worker : श्रीरामपूर : ग्रामसेवकांच्या भुमिकेमुळे हेळसांड होत असलेल्या बांधकाम मजुरांनी (Construction Worker) आज सकाळी येथील पंचायत समिती कार्यालयात ठिय्या (Movement) दिला. छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे (Nitin Patare) यांच्या नेत्तृत्त्वाखाली झालेल्या या आंदोलनात ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अखेर गटविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नक्की वाचा: पीएम किसानचा १८ वा हफ्ता ‘या’दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

मजुरांसाठी अनेक कल्याणकारी योजना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने मजुरांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्याअंतर्गत नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना मानधन, अपघात विमा, वैद्यकीय विमा, मातृत्व लाभ, वृद्धत्वाचा लाभ, काम करताना अपघात होऊन कामगाराला स्थायी किंवा अस्थायी अपंगत्व आल्यास लाभ मिळतो, काम करताना अपघातात मृत्यू झाल्यास मृत्यू लाभ, विवाहासाठी आर्थिक सहाय्य, मुलांना शिष्यवृत्ती असे अनेक लाभ मिळतात.

अवश्य वाचा: कॉपी करण्यासाठी माजी मंत्र्याने नेमला कन्सल्टंट : रोहित पवार

अनेक धनदांडग्यांनी लाभ घेतल्याच्या घटना (Construction Worker)

योजनेच्या लाभासाठी कामगाराची नवीन नोंदणी तसेच नुतणीकरणासाठी ऑनलाईन अर्ज भरताना ग्रामसेवकांचा दाखला आवशक असतो. मात्र, मजूर नसताना ग्रामसेकांना हाताशी धरून अनेक धनदांडग्यांनी या योजनांचा लाभ घेतल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या. ग्रामसेवकांच्या चौकशा सुरू झाल्या. कारवाईचा बडग्याला घाबरत ग्रामसेवकांच्या संघटनेने शासनाकडून कार्यपद्धती दिली जात नाही, तोपर्यंत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे ग्रामीण भागातील गरजू मजुरांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. बांधकाम मजुरांच्या नोंदणीसाठी अनेकदा अध्यादेश निघाले. प्रारंभी २०१५ मध्ये नोंदणी ग्रामसेवकांकडून करण्यात यावी असे म्हंटले. तरीही ग्रामसेवकांनी आडमुठेपणाची भूमिका घेत मजुरांची गैरसोय केली.


याबाबत छावाचे पटारे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कामात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले. सहाय्यक गटविकास अधिकारी उस्मान शेख व कक्षाधिकारी शिवाजी भिटे यांनी आंदोलकांची भेट घेऊन नोंदणीची कार्यवाही लवकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.


आंदोलनात अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, दादा बडाख, विजय बडाख, प्रवीण देवकर, राजू भिंगारे, निलेश बनकर, सुभाष मोरे, रामेश्वर जाधव, गणेश धुमाळ, किरण उघडे, अर्जुन बोरुडे, राजू जगताप, किशोर कर्डीले, उक्कलगाव चे सरपंच नितीन थोरात, रमेश गायकवाड, सचिन दहिमीवल, अशोक भुजाडी, भरत गायकवाड, संजय साठे, किरण कलनगे, मच्छिंद्र सुतार, आनंद साठे, बापू आहेर, सुनील बडाख, संदीप बडाख, किशोर गायकवाड, प्रदीप गायकवाड, प्रताप भुजाडी, रमेश मातंग, एकनाथ गोरे, केशव गडकर आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here