Construction Workers : कर्जतमधील बांधकाम कामगार संघटनेकडून फटाके फोडत जल्लोष

Construction Workers : कर्जतमधील बांधकाम कामगार संघटनेकडून फटाके फोडत जल्लोष

0
Construction Workers : कर्जतमधील बांधकाम कामगार संघटनेकडून फटाके फोडत जल्लोष
Construction Workers : कर्जतमधील बांधकाम कामगार संघटनेकडून फटाके फोडत जल्लोष

Construction Workers : कर्जत: राज्यातील असंघटित बांधकाम कामगारांना (Construction Workers) राज्य सरकारने (State Govt) ५ हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे नगर जिल्हा लोकशाही बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने कर्जतमध्ये फटाके फोडत आणि मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कामगारांचे राज्याचे नेते शंकर भैलुमे यांनी राज्य सरकारचे आभार मानत राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister), उपमुख्यमंत्री आणि कामगार नेते यांना अभिनंदन करणारे पत्र पाठवले.

नक्की वाचा: आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम

मागण्यासाठी उभारले होते मोठे आंदोलन

महाराष्ट्र राज्यात असंघटित कामगारांची संख्या मोठी आहे. या कामगारांच्या न्याय व हक्काच्या मागण्यासाठी लोकशाही बांधकाम संघटना यासह इतर कामगार संघटनेचे नेते शंकर भैलुमे यांनी वेळोवेळी बांधकाम कामगारांसह सातत्याने आंदोलन करीत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. नुकतेच अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी रिकामे भांडे वाजवत यासह हलगीच्या निनादात मोठे आंदोलन उभारले होते. सरकारने सदरचे आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ काही मागण्यांवर ठोस उपाययोजना अंमलात आणल्या.

अवश्य वाचा: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार : एकनाथ शिंदे

प्रत्येक कामगारांच्या कुटुंबास ५ हजार रुपये (Construction Workers)

दिवाळी सणासाठी प्रत्येक कामगारांच्या कुटुंबास ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान घेण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला असल्याची माहिती मिळताच कर्जत शहरात लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कामगारांनी फटाके फोडत जल्लोष करीत एकमेकांना मिठाई भरवत स्वागत केले. यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना आभाराचे पत्र संघटनेच्यावतीने पाठविण्यात आले. यावेळी कामगार संघटनेच्या एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने कामगार महिला आणि पुरुष उपस्थित होते.