Sambhaji Bhide : ‘नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही,नवरात्रीचे वाटोळं होऊ द्यायचे नाही’,असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी केले आहे. गणपती, नवरात्र सणाला आलेल्या उत्सवी स्वरूपावर बोलताना त्यांनी वक्तव्य केले. नवरात्र उत्सवानिमित्त सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीला (Durgamata Daud) आजपासून सुरुवात झालीय. संभाजी भिडे यांनी या दौडीत धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना सध्या साजरे केले जाणाऱ्या सण -उत्सवाच्या पद्धतीवर टीका केली आहे.
नक्की वाचा : भाऊबीजेलाही बहिणींना मिळणार ओवाळणी;अजित पवारांचा वादा
‘पाच वर्षाची मुलगी देखील दौडीत सहभागी होणार नाही’ (Sambhaji Bhide)
संभाजी भिडे यावेळी म्हणाले की, माता भगिनींनी स्वतंत्र दौड काढावी, मात्र या दौडीत महिलांना प्रवेश मिळणार नाही. काही माता भगिनींची इच्छा झाली दौडीत सहभागी होण्याची, हे स्वभाविक आहे. परंतु पाच वर्षाची मुलगी देखील दौडीत सहभागी होणार नाही. महिलांसाठी स्वतंत्र दुर्गा दौड काढायची, मात्र या दौडीत यायचे नाही. याचा बट्ट्याबोळ आणि वाटोळ आपल्याला करु द्यायचे नाही. सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत. ते करमणूक, मिरवणूक आणि मिळवणूक यासाठी राबवले जात आहे. आपल्याला त्या दौडीचा नाश करु द्यायचा नाही.
अवश्य वाचा : ‘लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय राहणार नाही’: एकनाथ शिंदे
मी पोलिस अधिकाऱ्यांना सूचवणार आहे की,आम्ही जनावरे आणि आमच्या पाठीवर हाकत चालले गुराखी असे पोलीस लोक आहेत.पोलीसांनी डोक्याला घातलेच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी धावलेच पाहिजे ही दुर्गा माता दौड आहे. या जमावात धावलेच पाहिजे,असे देखील संभाजी भिडे म्हणाले.
‘हिंदी-चीनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला’ (Sambhaji Bhide)
संभाजी भिडे पुढे म्हणाले की, आतापर्यंत ७६ राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केली. ते आता पाठलाग करत आहेत आणि आपण पाय लाऊन पळत आहोत. हिंदी – चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदूना शत्रू कोण,वैरी, वाईट कोण चांगलं कोण हे कळत नाही.महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात.राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण क्षुद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आपल्याला भारत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं देखील त्यांनी यावेळी सांगितले.