नगर : “आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हांडगं, दळभद्री स्वातंत्र्य आहे”,असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलं. पुण्यात पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केलंय. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य (Freedom) असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. संत तुकाराम महाराज तसंच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पुणे शहरात आगमन झालं. दरवर्षी या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे असंख्य कार्यकर्त्यांसह सहभागी होतात. याच पार्श्वभूमीवर संभाजी भिडे पुण्यात आले असता त्यांनी स्वातंत्र्याबाबत हे वादग्रस्त वक्तव्य केलं.
नक्की वाचा : सामान्यांच्या खिशाला कात्री;भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ
पुणे पोलिसांची भीडेंना वारीत सहभागी होण्यापूर्वी नोटीस (Sambhaji Bhide)
जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज तसंच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या बरोबर धारकरी पालखीत सहभागी होतात. याआधी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होते. यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना आषाढी वारीत सहभागी होण्यावर निर्बंध नसले, तरी त्यांना पुणे पोलिसांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी नोटीस दिली आहे. पालखी दर्शनावेळी कायदा-सुव्यवस्थेची काळजी घ्यावी, अशी सूचना भिडे यांना देण्यात आली.
अवश्य वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’सुरु
पुण्यात झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडे म्हणाले की,”वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आपल्याला रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचं आहे. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या सात मातांच्या संरक्षणासाठी वाटेल, ते करायला तयार असणं म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या व्रताची पथ्य आहेत. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, अशा १०- १० हजारांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. तसंच प्रत्येक तालुक्यात आपल्याला १० हजारांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची आहेत, असंही त्यांनी सांगितले.
‘वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये’ (Sambhaji Bhide)
वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, साडी घातलेल्या महिलांनीच जावं, असं विधान देखील भिडे यांनी केलं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.