convention: आमदार लहामटे यांनी विविध प्रश्नांवर अधिवेशनात उठवला आवाज

शबरी घरकुल योजनेतही सोलर प्लेटचा लाभ देण्यात यावा

0


convention: अकोले: राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात (convention) अनुदानाच्या मागण्यांवर अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्‍न आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सभागृहात मांडत सरकारचे लक्ष वेधले. यामध्ये बारी-संगमनेर रस्त्याची दुरुस्ती, भंडारदरा पर्यटन क्षेत्रातील काँक्रिट रस्ते निकृष्ट झाल्याने संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांवर कडक कारवाई (Action) करण्याची मागणी, लिंगदेव औद्योगिक वसाहत परिसरातील विकासाच्या दृष्टीने लिंगदेव-वाघापूर पुलाची मागणी, देवीचा घाट-चोंढे ते शहापूर रस्ता या कामाच्या सर्वेक्षणासाठी स्व. अजितदादा पवार यांनी दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्या सर्वेक्षणाचे पुढे काय झाले याचा खुलासा करावा, शेतकर्‍यांना दिवसा वीज कधी देणार?, तसेच सरकारी दवाखाने व शाळांचे वीज कनेक्शन थकबाकीमुळे तोडले जाऊ नयेत, यासाठी विशेष सूचना देण्याची मागणी केली.          

अवश्य वाचा- घायवाळच्या कानशिलात लागावणाऱ्या सागर मोहोळकरचा मृत्यू

युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा (convention)

लिंगदेव औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून त्या जमिनींचा विकास करण्यात यावा व उद्योग सुरू होऊन स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी मागणी केली. कामगार योजनांसाठी नोंदणी सुरू असली तरी दररोज 500 नोंदणी करण्याची अट घालण्यात आली आहे. ती अट अकोले तालुक्यासाठी व्यवहार्य नसल्याचे पटवून दिले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र एका ठेकेदाराला 50 किमीपर्यंत रस्त्यांची कामे दिली जात असून ती पुढे उपठेकेदारांकडे दिली जातात, त्यामुळे कामांची गुणवत्ता कमी होत असल्याकडे विशेष लक्ष द्यावे, मतदारसंघात सुमारे 3000 घरकुलांची गरज असताना फक्त 250 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत अशा परिस्थितीत शबरी घरकुल योजना पूर्ण कशी होणार असा प्रश्‍न उपस्थित केला.

नक्की वाचा-‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार

शबरी घरकुल योजनेतही सोलर प्लेटचा लाभ देण्यात यावा (convention)

शबरी घरकुल योजनेतही सोलर प्लेटचा लाभ देण्यात यावा, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे प्रश्‍न, आश्रमशाळांमधील कंत्राटी शिक्षक, विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या जेवणाची गुणवत्ता यावर उपाययोजना करावी अशी मागणी केली. अगस्ति साखर कारखान्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि कारभाराबाबत शंका असल्यास चौकशीही करावी. परंतु कारखाना सुरू राहणे अत्यंत आवश्यक असल्याने त्यासाठी तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. यापुढेही सभागृहात सातत्याने आवाज उठवत राहणार असल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले.