Cooking Competition : अहिल्यानगर : श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमुळे स्थानिक महिला व युवक-युवतींना त्यांच्या कलेला आणि गुणांना योग्य व्यासपीठ मिळते. या वर्षी मंडळाने महिलांसाठी खास पाककला स्पर्धेचे (Cooking Competition) आयोजन केले होते. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत एकूण 56 महिला स्पर्धकांनी (Female Contestants) उत्साहाने सहभाग नोंदविला.
नक्की वाचा : तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण होऊ शकते,तर महाराष्ट्रात का नाही ?- शरद पवार
नवनवीन खाद्यपदार्थ केले सादर
महिलांनी आपल्या कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार करून विविध पारंपरिक तसेच नवनवीन खाद्यपदार्थ सादर केले. ओरिओ मोदक, मक्याचे पॉकेट, ड्राय फ्रुट चाट, गुडालु, दूधी भोपळ्याचा तिरंगी हलवा, आलूचे वडे असे अनेक स्वादिष्ट पदार्थ सादर होताच वातावरणात सणासुदीचा गोडवा पसरला. महिलांच्या कल्पकतेला व परीश्रमांना उपस्थितांनीही दाद दिली.
आवश्य वाचा : सोनू सूद करणार स्टार प्लसच्या नवीन शो ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च
स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या महिलांची नावे (Cooking Competition)
- अवंतिका गाजेंगी – ओरिओ मोदक
- सुरेखा इराबत्तीन – मक्याचे पॉकेट
- आरती इराबत्तीन – ड्राय फ्रुट चाट
- मीना बुरगुल – गुडालु
- रोहिणी गाजुल – दूधी भोपळ्याचा तिरंगी हलवा
- सुप्रिया गाजेंगी – आलूचे वडे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चंद्रकांत बेत्ती यांनी मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. “गणेशोत्सवाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या रोजच्या दगदगीतून एक हक्काचा आनंद मिळावा, त्यांना वेगळेपणाची जाणीव व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने दरवर्षी मंडळाच्या वतीने पाककला, संगीत खुर्ची, व्हिडिओ वळवणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन सुंकी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत आडेप यांनी मानले. उपस्थित मान्यवर, स्पर्धक व प्रेक्षकांनी महिलांच्या कलागुणांना मिळालेल्या या व्यासपीठाचे कौतुक केले.
महिलांच्या प्रतिभेला योग्य मंच उपलब्ध करून देण्याचे कार्य श्री एकदंत गणेश मंडळ गेली अनेक वर्षे करत आहे. या पारंपरिक उपक्रमामुळे गणेशोत्सव अधिक रंगतदार व समृद्ध होत असून, महिलांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही मंडळाच्या कार्याला मिळालेली खरी दाद असल्याचे समाधान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.