Cooperative Organization : सहकारी संस्था असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास : रावसाहेब वर्पे 

Cooperative Organization : सहकारी संस्था असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास : रावसाहेब वर्पे

0
Cooperative Organization : सहकारी संस्था असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास : रावसाहेब वर्पे 
Cooperative Organization : सहकारी संस्था असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास : रावसाहेब वर्पे 

Cooperative Organization : नगर : सहकार (Cooperation) चळवळीमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (Cooperative Organization) मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात सहकारी संस्था भक्कमपणे उभा असल्याने जिल्ह्याचा सर्वांनी विकास झाला आहे. या सहकारी संस्थांना जिल्हा बँकेचे मोठे पाठबळ असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (ADCC Bank) मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे (Ravsaheb Varpe) यांनी केले.

नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतील हजारो अर्ज बाद;नव्या नोंदी बंद 

नारायण गव्हाण येथे वृक्षारोपण

नाबार्डच्या वर्धापन दिनानिमित्त व नाबार्डतर्फे एक पेड माँ के नाम या संकल्पने अंतर्गत नाबार्ड, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व नारायण गव्हाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नारायण गव्हाण येथे वृक्षारोपण करण्यात आले. 

अवश्य वाचा :  ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’;’या’ दिवशी होणार प्रदर्शित  

ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित (Cooperative Organization)

यावेळी नाबार्डचे डीडीएम विक्रम पठारे, जिल्हा बँकेचे  जनरल मॅनेजर संजय बर्डे, दिलीप पठारे, वसुली अधिकारी बाबासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी भारत सोले पाटील, तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.