Copy in Exam | गणिताच्या पेपरला कर्जतमध्ये पकडले सात कॉपी बहाद्दर; शिक्षण विभागाच्या पथकाची कारवाई 

Copy in Exam | गणिताच्या पेपरला कर्जतमध्ये पकडले सात कॉपी बहाद्दर; शिक्षण विभागाच्या पथकाची कारवाई 

0

Copy in Exam | कर्जत: कर्जत शहरातील दोन परीक्षा केंद्रावर बारावीच्या गणिताच्या पेपरला सात विद्यार्थ्यांना कॉपी (Copy in Exam) करताना भरारी पथकाने पकडले. संबंधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका तात्काळ पर्यवेक्षकाने ताब्यात घेत त्यांच्यावर पुढील कारवाई पार पाडली. या प्रकाराने काही काळ परीक्षार्थी आणि पालकांमध्ये चांगलीच घबराट पसरली होती. याबाबत कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला. 

अवश्य वाचा- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रक स्पर्धेमध्ये अहिल्यानगर संघाचा सहभाग

तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचे कडक लक्ष (Copy in Exam)

सध्या सर्वत्र बारावीच्या परीक्षेची धामधूम सुरू असून कॉपीमुक्त परीक्षा यासाठी शिक्षण विभाग सतर्क आहे. कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर आणि वर्गात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली असून तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासन देखील यावर कडक लक्ष ठेवून आहे. शनिवार, दि २१ रोजी कर्जत शहरात बारावीचा गणित विषयाचा पेपर महात्मा गांधी विद्यालय आणि दादा पाटील महाविद्यालयावर सुरू होता. यावेळी महात्मा गांधी विद्यालयातील २ आणि दादा पाटील महाविद्यालयातील ५ असे एकूण ७ विद्यार्थी कॉपी करताना शिक्षण विभागास निदर्शनास आले.

नक्की वाचा- लग्नाचं आमिष अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये आरोपीला लाल टाकी परिसरातून अटक

दोन्ही केंद्रावर चांगलीच घबराटीचे वातावरण (Copy in Exam)

संबंधित भरारी पथकाने आणि परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकांनी सबंधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिका तात्काळ ताब्यात घेत त्यांना परीक्षा हॉलच्या बाहेर काढले. या दरम्यान काही काळ दोन्ही केंद्रावर चांगलीच घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पालकांनी देखील दोन्ही केंद्रावर धाव घेत वर्ष वाया जाऊ नये यासाठी विनंती केली. याबाबत कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ७ विद्यार्थी गणित विषयाची कॉपी करताना आढळले असल्याच्या घटनेस दुजोरा दिला असून याबाबत जिल्हा विभागास देखील कळविण्यात आले आहे. संबंधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर पुढील कार्यवाही बाबत अहवाल दिला असल्याचे सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here