Corona | सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल; कोरोना काळात बनावट रिपोर्ट बनवून अवयव तस्करीचा आरोप

0
corona
corona

Corona | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील नामांकीत सहा डॉक्टरांन विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटकारस्थान करणे, खोटे कागदपत्र तयार करणे, तसेच चुकीच्या उपचाराने मृत्यूस कारण बनणे, फसवणूक करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा (Corona) खोटा अहवाल बनून अवयवदानाची तस्करी केला असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. ही घटना २०२० मध्ये घडले असल्याची त्यांनी म्हटले आहे. 

अवश्य वाचा : आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

या डॉक्टरांवर गुन्हा दाखल (Corona)

डॉ. गोपाळ बहुरुपी (रा. न्युक्लिअस हॉस्पिटल, डॉ. सुधीर बोरकर (रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर), डॉ. मुकुंद तांदळे, (रा. सावेडी, अहिल्यानगर), डॉ. अक्षयदीप झावरे पाटील (रा. अहिल्यानगर), डॉ. सचिन पांडुळे (रा. अहिल्यानगर), डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटल, विळद घाट, अहिल्यानगर येथील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ज्ञ डॉक्टर व इतर अज्ञात कर्मचारी, असे गुन्हा दाखल झालेल्या संशितांचे नाव आहे. याबाबत अशोक बबनराव खोकराळे (वय ४७,  रा. प्लॉट नंबर-२६, कृष्णा पॅलेस, हनुमान नगर, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. 

नक्की वाचा : दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास

फिर्यादीत म्हटले आहे की… (Corona)

फिर्यादीत म्हटले आहे की कोरोना असल्याचा बनाव करुन व त्याबाबत खोटे कागदपत्र तयार करुन, कोरोना संसर्गित रुग्णासोबत मर्जी विरुध्द अॅडमीट करुन त्याच कक्षात रुग्णाचे जीवितावर होणाऱ्या जिवघेण्या परिणामांची कल्पना असताना ही जास्तीचा डोस देऊन जीवितास धोका निर्माण होईल,असे कृत्य करुन त्यांचे मृत्यूस कारणीभूत होणे, अवाजवी अवास्तव बिल रक्कम आकारणे, शरीराचे अवयवदनाची तस्करी व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने  प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here