Corruption : श्रीगोंदा: शहरातील जिल्हा परिषदेच्या (ZP) मुलींच्या शाळेत पी.एम.श्री. व शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केल्याच्या रागातून शाळेत शिकत असलेल्या वीरा टिळक भोस, जिजा अरविंद कापसे या लहान मुलींना परिपाठामध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर अपमानित केल्यामुळे (Insulting) शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करावी, या मागणीसाठी पालकांकडून पाल्यासह पंचायत समिती कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
नक्की वाचा : नगरकरांमध्ये अजूनही मोटर सायकलचीच क्रेझ; कारपेक्षा ट्रॅक्टरला मागणी जास्त
सर्व विद्यार्थ्यांच्यासमोर केले अपमानित
जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत पी.एम.श्री. व शालेय पोषण आहारात मुख्याध्यापिकेने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पालकांनी केला. या रागातून मुख्याध्यापिका यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करणारे टिळक भोस तसेच अरविंद कापसे यांच्या मुली वीरा भोस, जिजा कापसे या दोघींना शालेय परीपाठमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्यासमोर अपमानित करून त्यांना मानसिक त्रास दिला.
अवश्य वाचा : राशीनमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा पकडला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अधिकारी मुख्याध्यापिकेस पाठीशी घालत असल्याचा आरोप (Scam)
मुख्याध्यापिकेच्या विरोधात सर्व पुरावे असून देखील पंचायत समिती श्रीगोंदा गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी हे मुख्याध्यापिकेस पाठीशी घालत असल्याचा आरोप टिळक भोस यांनी केला. यावेळी सतीश बोरुडे, संदीप साळवे, विलास रसाळ, रामदास नन्नवरे, शिवप्रसाद उबाळे, नाना शिंदे, अरविंद चव्हाण, सुनील ढवळे, गणेश पारे, शाम जरे, सतीश बोरुडे, प्रदीप ढवळे, तौसीम शेख,संदीप साळवे यांच्यासह पालक उपस्थित होते.