Corruption : ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Corruption : ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

0
Corruption : ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
Corruption : ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Corruption : नगर : कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचाय (Mirajgaon Grampanchayat) मध्ये २०२१ मध्ये माझी वसुंधरा योजनेत अपहार (Corruption) झाला आहे. या निधीचा खर्च नियमांचे पालन करून व पर्यावरण विभागाच्या परवानगीनेच करणे बंधनकारक असताना, विद्यमान सरपंच व सरपंचपती व ग्रामपंचायत सदस्य नितीन खेतमाळस, तसेच तत्कालीन ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांनी नियमबाह्य व्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधितावर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (District Collector’s Office) आंदोलन करण्यात आले.

अवश्य वाचा : विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – प्रताप सरनाईक

यावेळी उपस्थिती

यावेळी गुलाब तनपुरे, अमृत लिगडे, चंद्रकांत कोरडे, पंढरीनाथ गोरे, अमोल माने, सागर पवळ, सलीम आतार, सुनील गायकवाड, बबन दळवी, आनंद त्रंबके, ईश्वर माने, अशोक माने, अनिल माने, वसंत जाधव, अभिमान जाधव, सुरेश माने, मोहन भालेराव, प्रकाश सकट, मोहित सकट, अमोल सकट, राम रणदिवे, दिनेश पवळ आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : सुपा येथे विमानतळ उभारा; खासदार नीलेश लंके यांची केंद्र सरकारकडे मागणी

कोणतेही टेंडर दिले नसतानाही रक्कम खात्यावर जमा (Corruption)

ग्रामपंचायतच्या कॅशबुक नोंदींनुसार, २५ ऑक्टोबर २०२२ रोजी सरपंचांचा भाचा आकाश वाघ यांच्या नावावर १० लाख रुपये वर्ग करण्यात आले. आकाश वाघ हा शासकीय नोकरदार असून, त्याला कोणतेही कामाचे टेंडर दिले नसतानाही ही रक्कम खात्यावर जमा करण्यात आली? या अपहारप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून रक्कम दंडासह वसूल करावी व संबंधितांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.