
Corruption : नगर : अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये (Zilla Parishad Ahilyanagar) प्रशासक काळातील कामांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते जालिंदर वाकचौरे (Jalindar Wakchaure) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडसणीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले आहे.
नक्की वाचा : जगातील पहिली सापाचं विष शोधणारी किट विकसित; डॉ. शाम भट यांच्या प्रयत्नांना यश
प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त
जिल्हा परिषदेमध्ये २०२२ पासून प्रशासक आहेत. या कार्यकाळात जिल्हा परिषदेने जवळपास विविध योजनेतून दोन हजार ५०० कोटींचा खर्च केला आहे. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच अनेक कामे कागदावरच असून जी कामे झाली त्याची टेंडर चुकीच्या पद्धतीने केली आहेत, असा आरोप ही त्यांनी केला आहे.
अवश्य वाचा : मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार
प्रशासक काळातील कारभाराची चौकची मागणी (Corruption)
याशिवाय, ज्या वस्तू जिल्हा परिषदेने खरेदी केल्या त्या सुद्धा निकृष्ट असून, अवाच्या सवा किमती लावल्या आहेत, असे सांगून, प्रशासक काळातील कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री यांच्याकडे वाकचौरे यांनी केली.


