पाथर्डी: तालुक्यात बनावट नोटा (Counterfeit notes) चलनात आल्याने व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ (excitement) उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाथर्डी शहर व तालुक्यातील बाजारपेठेत दोनशे आणि शंभर रुपयांच्या बनावट नोटा सर्रासपणे त्याचा चलनात वापर होत आहे. या नोटांचा तालुक्यात सुळसुळाट (smooth) झालेला आहे. यापूर्वी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात (In currency) येत होत्या. मात्र, आता छोट्या चलनाच्या नवीन दोनशे व शंभर रुपयांच्या नोटा आल्याने व्यापाऱ्यांना अडचणीचा सामना आता करावा लागत आहे. दुकानात अनेक ग्राहक सामान खरेदीसाठी येतात त्यातून एखाद्या ग्राहकांकडून बनावट नोट चलनात आली तर व्यवसायामध्ये त्या दुकानदाराला भुर्दंड सोसावा लागत आहे. ही परिस्थिती पाहता बनावट नोटा ((Counterfeit notes) ओळखण्यासाठी अनेक दुकानदारांनी आता नोटा मोजण्याबरोबर ती नोट खरी का खोटी याची तपासणी करण्यासाठी मशीन घेतल्या आहेत.
हे देखील वाचा: अण्णा हजारे यांना पहिलं जागं करा; संजय राऊत यांचा खाेचक सवाल
व्यापाऱ्यांची फसवणूक (Counterfeit notes)
तालुक्यात मोठ्या प्रमाणात चलनातून बनावट नोटा (Counterfeit notes) मार्केट मध्ये पसरल्या आहेत. हुबेहूभ शंभर, दोनशेच्या नोटा सर्वत्र पसरल्या असून दैनंदिन व्यवहार करणारे व्यापाऱ्यांना सुध्दा ह्या नोटा बनावट असल्याचे लक्षात येत नाही. अनेक ग्रामीण भागातील शेतकरी व अन्य लोक शेती व्यवसायाबरोबर छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी तालुकाभर फिरत असतात. त्यावेळी त्यांच्याकडे येणाऱ्या काही बनावट ग्राहकांकडून चलनातील खऱ्या असलेल्या नोटाप्रमाणे दिसणाऱ्या बनावट नोटा देऊन त्यांची फसवणूक केली जाते.
नक्की वाचा: महत्त्वाची बातमी! नगरसह अनेक रस्त्यांच्या वाहतुकीत बदल; असा असेल बदल
सतर्क राहण्याची गरज (Counterfeit notes)
त्यानंतर तो छोटा व्यवसायीक मोठ्या दुकानात जातो. त्यावेळी त्याला समजते की आपल्याला बनावट नोट देण्यात आली आहे. तर काही मोठ्या दुकानदारांनाही ही बनावट नोट ओळखू येत नाही. त्यामुळे आता ग्राहक, दुकानदार व नागरिकांनी बनावट नोटांपासून सतर्क राहण्याची गरज आहे. आलेली प्रत्येक नोट तपासून घेणे हीच मोठी दक्षता सध्यातरी मानले जात आहे. मात्र, या बनावट नोटा कुठून व कशा आल्यात यामागे कोणते रॅकेट आहे? याचा तपास होणे गरजेचे असल्याने यावरती पोलीस यंत्रणेने लक्ष घालण्याची गरज आहे.