Counting of Votes : मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; नगर, शिर्डी लाेकसभेसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Counting of Votes : मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; नगर, शिर्डी लाेकसभेसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

0
Collector
Collector

Counting of Votes : नगर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक (Lok Sabha Elections) २०२४ च्या अनुषंगाने मंगळवार (ता. ४) मतमोजणी (Counting of Votes) होणार आहे. अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे दीड हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन मतमोजणीसाठी सर्व निवडणूक (Election) यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

हे देखील वाचा: माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का?; रोहित पवारांचा राणांना सवाल

जिल्हाधिकारी स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून

मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व यंत्रणा सज्जता केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र. १ येथे, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र. ३ मध्ये होणार आहे.

Election Commission
Counting of Votes

नक्की वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

एका विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल (Counting of Votes)

अहमदनगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात शेवगाव-पाथर्डी, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदे व कर्जत-जामखेड, असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासे, असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी फेऱ्या

विधानसभा मतदार संघनिहाय असणाऱ्या व मतदान केंद्रनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले ३०७ मतदान केंद्र २२ फेऱ्या. संगमनेर २७८ मतदान केंद्र २० फेऱ्या. शिर्डी २७० मतदान केंद्र २० फेऱ्या. कोपरगाव २७२ मतदान केंद्र २० फेऱ्या. श्रीरामपूर ३११ मतदान केंद्र २३ फेऱ्या. तर नेवासे २७० मतदान केंद्र २० फेऱ्या होणार आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव-पाथर्डी ३६५ मतदान केंद्र २७ फेऱ्या. राहुरी ३०७ मतदान केंद्र २२ फेऱ्या. पारनेर ३६५ मतदान केंद्र २७ फेऱ्या. नगर शहर २८८ मतदान केंद्र, २१ फेऱ्या. श्रीगोंदे ३४५ मतदान केंद्र, २५ फेऱ्या, तर कर्जत-जामखेड ३५६ मतदान केंद्र असून २६ फेऱ्या होणार आहेत.

मतमाेजणी केंद्रावर सीसीटीव्हीचा वाॅच

मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे निगराणी होत आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here