Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. मलिक यांचा मेडिकल जामीन कोर्टाने कायम ठेवला आहे. जोपर्यंत ते आजारी आहेत तोपर्यंत त्यांना जेलच्या बाहेर राहता येणार आहे. विशेष म्हणजे मलिक यांच्या जामिनाला सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने (ED) विरोध केलेला नाही.
नक्की वाचा : ‘कलर्स मराठी’वर येणार नवीन मालिका; पहिली झलक आली समोर
नवाब मलिक हे मागील काही दिवसांपासून मेडिकल जामीनावर बाहेर आहेत. त्यांनी जामिनाला मुदतवाढ मिळावी, यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज सुद्धा दाखल केला होता. याआधी त्यांना आठवडा किंवा दोन आठवडा अशी मुदत मिळत होती. त्यामुळे त्यांना वारंवार अंतरिम जामीनासाठी वारंवार अर्ज करावा लागत होता.आता त्यांची या त्रासापासून मुक्तता होणार आहे.
अवश्य वाचा : नगरमध्ये १२ ऑगस्ट रोजी धडकणार मराठ्यांचे वादळ; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू
नवाब मलिक यांच्या जामिनावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी (Nawab Malik)
नवाब मलिक यांच्या जामिनावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जोपर्यंत नवाब मलिक हे आजारी आहेत, तोपर्यंत ते बाहेर राहू शकतील. तोपर्यंत त्यांना तुरुंगातही टाकता येणार नाही. याशिवाय, ते आजारी असेपर्यंत जामीनावर राहू शकतात, असं कोर्टाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं आहे. याशिवाय ईडीने देखील याला विरोध केलेला आहे. त्यामुळे मलिक यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.