Court verdict | नगर : डॉ. प्रकाश कांकरिया यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी आज (ता. २५) न्यायालयीन निकाल (Court Verdict) दिला. त्यानुसार १७ आरोपींना दोषी धरून १ वर्षाची साधी कैद व ११ हजारांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार, केदार केसकर यांनी काम पाहिले.
हे वाचा – विद्यार्थी वसतीगृहाच्या उभारणीसाठी प्रस्ताव सादर करा : ललित गांधी
या आरोपींना झाली शिक्षा (Court Verdict)
आरोपी संजीव बबनराव भोर (रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर), महादेव परशुराम भगत (रा. कापूरवाडी), बलभीम परशुराम भगत (रा. कापूरवाडी), बाबासाहेब बाबुराव जरे (रा. इमामपूर), संतोष विठ्ठल वाडेकर (रा. देसवडे, ता. पारनेर), आदिनाथ शंकरराव काळे (रा. वांजोळी, ता. नेवासा), रमेश अशोक बाबर (रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर), आरोपी मयत किशोर सुनील आर्डे), अरुण बाबासाहेब ससे (रा. जेऊर), संदीप शंकर पवार (रा. एम.आय.डी.सी), शरद गंगाधर (रा. एम.आय.डी.सी), कैलास शिवाजी पठारे (रा. जेऊर), योगेश गोविंद आर्डे (रा. मल्हार नगर, एम.आय.डी.सी), गणेश जितेंद्र शिंदे (रा. एम.आय.डी. सी), विठ्ठल उमेश गुडेकर (रा.एम.आय.डी.सी), बापू बाबासाहेब विरकर (रा.एम.आय.डी.सी), सागर कडुबा घाणे (रा. नवनागापूर), असे शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
अवश्य वाचा – शेवगावात ऑनलाईन बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
सात साक्षीदार तपासले (Court Verdict)
याबाबत हकीगत अशी की, फिर्यादी डॉ. प्रकाश कांकरीया (रा. माणिकचौक), यांना तपासणीच्या फी वरून आरोपींनी हॉस्पीटल मध्ये घुसून मारहाण व सामानाची तोडफोड केली होती. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्या महिलेचे पती विनयभंगाची तक्रार मिटवण्यासाठी फिर्यादीकडे ११ लाखांची मागणी केली. त्यानंतर वरील आरोपींनी डॉक्टर यांच्या हॉस्पिटलमध्ये येऊन लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या तोंडाला काळे फासले होते. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी या घटनेचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी यांची साक्ष महत्वपूर्ण मानण्यात आली. सरकारी वकील अर्जुन पवार यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने वरील आरोपींना शिक्षा सुनावली आहे. यावेळी पैरवी अधिकारी सहायक फौजदार विलास साठे यांनी काम पाहिले.