नगर : कोरोना लसीसंदर्भात (Covid Vaccine) मोठी माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूविरोधात वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड (Covishild) लसीचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी कबुली अॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे. गेल्या चार वर्षात अॅस्ट्राझेनेकाने पहिल्यांदाच अशी कबुली दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतात अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून कोव्हिशिल्ड ही लस तयारी केली होती. त्यानंतर ही लस भारतासह जगभरातील नागरिकांना देण्यात आली.
नक्की वाचा : सॉल्टची अर्धशतकी खेळी;कोलकात्याचा दणदणीत विजय
दोन वर्षापूर्वी जगभरात कोरोनाने थैमान मांडले होते. यात अनेक जणांचा मृत्यू झाला. लाखो लोकांनी कोरोना महामारीत आपला जीव गमावला आहे. त्यावेळी कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लस तयार करण्यात आली होती. या रोगापासून बचाव करण्यासाठी जगभरातील असंख्य लोकांनी ही लस घेतली आहे. भारतात देखील जवळपास दोन कोटीपेक्षा अधिक लोकांनी या लसीचे दोन डोस घेतले आहेत.
अवश्य वाचा : ‘कर्मवीरायण’ मधून उलगडणार भाऊराव पाटलांचा जीवन प्रवास; ‘हा’ अभिनेता साकारणार अण्णांची भूमिका
कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळतात (Covid Vaccine)
अॅस्ट्राझेनेकाने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचा दावा ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने केला होता. तसेच त्याने अॅस्ट्राझेनेका कंपनीविरोधात तेथील न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवर उत्तर देताना कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविराकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो, अशी कबुली अॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिली. मात्र हे दुष्परिणाम क्वचितच आढळू शकतात, त्यामुळे नागरिकांना घाबरू नये, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. ही लस कोरोनाचा सामना करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचं तपासणीमध्ये सिद्ध झालं आहे. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रुग्णांची सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.