Cow Death Case | हिवरे बाजार येथील मृत गायी प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली दखल

0

Cow Death Case | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) आणि पारनेर (Parner) तालुक्यात अज्ञात रोगाने बळी गेलेल्या गायींच्या मृत्यूचे (Cow Death Case) निदान अद्याप झालेले नाही. पुण्याच्या प्रयोग शाळेत मृत गायींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले असून त्याच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. 

नक्की वाचा: विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अमानुष वागणुकीबाबत खताळ यांनी वेधले लक्ष; कारवाईची मागणी

गायींचा मृत्यू कशामुळे? (Cow Death Case)

दरम्यान, या प्रकरणी पद्मश्री पोपटराव पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर पशूसंवर्धन विभागाचे आयुक्त प्रवीण देवरे यांनी संबंधीत गायींचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास करण्यासाठी अभ्यास गट नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अवश्य वाचा – संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी लावणार – पालकमंत्री विखे पाटील

९ गायींना नेमके काय झाले? (Cow Death Case)

दुसरीकडे रविवारी दुपारपर्यंत नगर आणि पारनेर तालुक्यात मृत झालेल्या ३२ गायी व उपचार सुरू असणाऱ्या ९ गायींना नेमके काय झाले? त्या कशामुळे आजारी पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला याचे निदान झालेले नव्हते. मात्र, रविवारी क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय पशू वैद्यकीय (शिरवळ) सातारा येथील चार पशूवैदक यांचे पथक नगर तालुक्यात आले होते. 

पथकातील डॉक्टर हे पशू औषध शास्त्र, सूक्ष्मजीव शास्त्र, जनवरांचे सामूहिक सार्वजनिक आरोग्य याचे अभ्यासक आहे. त्यांनी उपचार सुरू असणाऱ्या गायींची पाहणी केली. नव्याने दोन गायीचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतलेले आहेत. तसेच या जनावरांच्या चाऱ्यात बदल करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती पशु संवर्धन उपायुक्त उमेश पाटील यांनी दिली.

थेट मुख्यमंत्र्यांना पत्र (Cow Death Case)

दरम्यान, मृत गायी अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव हिवेरबाजार आणि परिसरातील आहेत. गेल्या १४ फेब्रुवारीपासून अहिल्यानगर आणि पारनेर तालुक्यातील गायीबाबत हा प्रकार सुरू असतांना पशुसंवर्धन विभाग आतापर्यंत काहीच करू शकलेला नाही. यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या ३२ गायी मृत पावलेल्या आहेत. या प्रकरणी पहिल्या दिवसांपासून पद्ममी पोपटराव पवार पाठपुरवा करत असतांना पशुसंवर्धन विभागाने आवश्यक तेवढे लक्ष दिले नसल्याची चर्चा आहे. यामुळे अखेर पवार यांना याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याची वेळ आली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ या प्रकाराची दखल घेतली असून पशुसंवर्धन विभागाचे सचिव व आयुक्त यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पशूसंवर्धन विभागाचे आयुक्त देवरे यांनी तातडीने या प्रकरणी मृत जनावरांसह त्यांचा चारा, पाणी यांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात येणार असल्याचे पश्रमी पवार यांना कळवले आहे.

रक्त, शेण आणि खाद्याचे नमुने (Cow Death Case)

गायींचे रक्त, शेण आणि खाद्याचे नमुने घेतले. शासकीय महाविद्यालयाच्या पथकाकडून उपचार सुरू असणाऱ्या नगर तालुक्यातील दोन गायींचे रक्त, शेण आणि खाद्याचे नमुने घेण्यात आलेले आहेत. सातारा येथील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पथकात डॉ. आंभोरे, डॉ. म्हसे, डॉ. माने आणि अन्य एका व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

हे पहा – अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ चिमुरड्यांचा जन्म रस्यावरच झाला

एकत्रिकरणाचे वारे (Cow Death Case)

राज्य सरकारचा पशूसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे गेल्या वर्षभरापासून एकत्रिकरणाचे वारे वाहत आहे. मात्र, अद्याप हे एकत्रिकरण झालेले नाही. यामुळे या विभागाच्या कामात विस्कळीतपणा आल्याची चर्चा आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक पशुधन असून उत्तर नगर जिल्ह्यात त्याचे प्रमाण अधिक असल्याने भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नयेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. ३० लाखांहून अधिकचा फटका ज्या शेतकऱ्यांच्या गायी मृत झालेल्या आहेत. त्यांचे ३० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झालेले आहे. साधारणपणे एका दुभत्या गायीची किंमत १ लाख ते सव्वा लाख रुपये आहे. आतापर्यंत ३२ गायी मृत पावलेल्या असून यामुळे शेतकऱ्याचे ३० लाखांहून अधिकचे नुकसान झालेले आहे. मृत गायीच्या किंमतीच्या सुमारे ७० ते ८० टक्के रक्कमेची शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी पद्मश्री पवार यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here