CPI : जनहिताच्या प्रश्‍नांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

CPI : जनहिताच्या प्रश्‍नांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

0
CPI

CPI : नगर : शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतीमालाला हमीभाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, देशभरात जातनिहाय जनगणना करावी, आदी जनहिताच्या मागण्या व जनसामान्यांच्या प्रश्‍नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे (CPI) शुक्रवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारच्या (Govt) जनविरोधी धोरणाचा निषेध नोंदवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नक्की वाचा: आसाम सरकारचा मोठा निर्णय; नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी सुट्टी बंद

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे व धरणे आंदोलन

या आंदोलनात भाकपचे राज्य सक्रेटरी ॲड. सुभाष लांडे, जिल्हा सेक्रेटरी बन्सी सातपुते, ॲड. सुधीर टोकेकर, भारती न्यालपेल्ली आदी उपस्थित हाेते. सामान्यांचे जगणे दिवसंदिवस गंभीर होत चालले आहे. त्यांच्या समस्या तीव्र होत आहे. ग्रामीण व शहरी भागातील जनता विविध संकटांचा सामना करत आहे. या प्रश्‍नांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनसामान्यांच्या प्रश्‍नावर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे व धरणे आंदोलन करण्यात आले.