Cricket Tournament : संगमनेर: काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील 25 वर्षापासून जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर (Cricket Association of Sangamner) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत असून यावर्षीही 1 जानेवारी 2025 ते 17 जानेवारी 2025 या काळात ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी दिली.
नक्की वाचा : भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन होणार! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले, सहकारमहर्षी चषक ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठेची आणि नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. या स्पर्धेचे हे 25 वे वर्ष आहे. याकरता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन करण्यात आले आहे. आयपीएल व राज्य पातळीवर खेळणाऱ्या विविध खेळाडूंचा सहभाग यावर्षीच्या या स्पर्धेत राहणार आहे.
अवश्य वाचा : ‘महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा वीज महाग’-जयंत पाटील
लाखोंची बक्षिसे (Cricket Tournament)
यावर्षी प्रथम बक्षीस 2,01,000 ( दोन लाख एक हजार ) रुपये, द्वितीय बक्षीस 1,31,000 ( एक लाख 31 हजार ) तृतीय बक्षीस 71,000 आणि चतुर्थ बक्षीस 31,000 असणार आहेत. याचबरोबर इतरही वैयक्तिक बक्षिसांचा समावेश या स्पर्धेत आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या स्पर्धेचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी किमान दहा हजार प्रेक्षकांची उपस्थिती लाभणार असून हे सामने अधिक रंगतदार व दर्जेदार होण्यासाठी ढोल ताशांच्या गजरासह विविध मनोरंजन सुविधा करण्यात आले आहेत. दरवर्षी संगमनेर मध्ये राज्यस्तरीय आयोजन असल्याने यापूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष खासदार राजू शुक्ला, महाराष्ट्र क्रिकेटचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरी,अमृता खानविलकर, प्रणव धनवडे यांसह अनेक इतर दिग्गज मान्यवर उपस्थित राहिले आहेत. तसेच या स्पर्धेत भारतीय संघातील सलील अंकोला, अजित आगरकर, झहीर खान, कसोटीपटू अजिंक्य रहाणे यांनीही त्यांची कामगिरी या स्पर्धेत दाखवली आहे. यावर्षी या स्पर्धेचे 25 वर्ष असून या स्पर्धेमध्ये हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत अनेक कलावंत आणि भारतीय क्रिकेट संघातील व आयपीएल मधील अनेक क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत.