Cricket Tournament : नगर : अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (Ahmednagar District Cricket Association) मान्यतेने आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक १९ वर्षांखालील (टी २०) क्रिकेट स्पर्धेचा (Cricket Tournament) अंतिम सामना काल (ता. १६) झाला. या स्पर्धेचा अंतिम सामना आर. एल. अकादमी विरुद्ध प्रियदर्शनी क्रिकेट अकादमी यांच्यात झाला. प्रियदर्शनी क्रिकेट अकादमी संघाने हा सामना ६ गडी राखून जिंकत १९ वर्षांखालील बाळासाहेब पवार स्मृती करंडक (Balasaheb Pawar Memorial Trophy) पटकाविला.
नक्की वाचा : आंबेडकरवादी समाजाची कचेरीसमोर निदर्शने; परभणी घटनेचा केला निषेध
आर. एल. क्रिकेट अकादमीच्या २० षटकांत ७ बाद १५० धावा
आर. एल. क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. सोहम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना आर. एल. क्रिकेट अकादमी संघाने २० षटकांत ७ बाद १५० धावा केल्या. प्रतीक फुलारेने ३९ धावा, रोहित पटेलने ३० धावा, सार्थक मगरने २७ धावा, गुरुप्रसाद पांडेने १८ धावा तर तनिष उदावंतने १७ धावा केल्या. प्रियदर्शनी क्रिकेट अकादमीकडून ओम यादवने २५ धावा देत ३ बळी मिळविले तर विशाल यादवने १४ धावांत २ बळी घेतले. तर अध्ययन कदमने १ गडी बाद केला.
अवश्य वाचा : शहरातील ९० हजार मालमत्तांवर लावले ‘क्यूआर कोड’; अहिल्यानगर महापालिकेचा उपक्रम
प्रियदर्शनी अकादमीने १९.४ षटकांत १५१ धावा करत सामना जिंकला (Cricket Tournament)
प्रियदर्शनी क्रिकेट अकादमी संघाने १९.४ षटकांत ४ बाद १५१ धावा करत सामना जिंकला. प्रणय सिसवालने ५२ चेंडूत ८४ धावा तर ईरफान सय्यदने ३८ चेंडूत ३८ आतिषी फलंदाजी केली. आर एल क्रिकेट अकादमी संघाकडून रोहित पटेलने २४ धावांत ३ बळी मिळवले.
सामनावीर म्हणून प्रियदर्शनी क्रिकेट अकादमी संघाचा प्रणय सिसवालची निवड करण्यात आली. पंच म्हणून सागर बनसोडे तसेच विशाल कांबळे तर स्कोअरर म्हणून अजय कविटकर यांनी कामकाज पाहिले. १४, १६,१९ वर्षांखालील गटांचे एकत्रित पारितोषिक वितरण २९ डिसेंबरला करण्यात येईल.