Crime : संगमनेर : प्रेम आंधळे असते, असे म्हणतात. त्याप्रमाणे संगमनेर तालुक्यातील एका आश्रमशाळेतील (Ashram school) इयत्ता सातवीच्या मुलीला दहावीच्या मुलासोबत प्रेम झाले. वसतिगृह (Hostel) एव्हढे गाढ झोपले की, त्यात ती मुलगी गरोदर राहिली. नंतर आईवडिलांच्या संमतीने बालविवाह (child marriage) करण्यात आला. अल्पवयातच बाळाला जन्म द्यावा लागल्याने रुग्णालयाने पोलिसांना (Police) कळवून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला.
हे देखील वाचा : शेतकऱ्यांना कांदा निर्यातबंदीचा घाव; तब्बल एक हजार कोटींचा फटका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका गावातील पीडित मुलीला एका आश्रम शाळेत शिकण्यासाठी पाठविले. पाचवीच्या वर्गात शिकत असताना तिची ओळख आठवी वर्गात शिकत असणाऱ्या मुलासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि तब्बल दोन वर्ष प्रेमाचे धडे गिरवत असताना मुलगी सातवीच्या वर्गात आली आणि मुलगा दहावीच्या वर्गात गेला. दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या. त्यामुळे आई तिला घरी घेऊन गेली. काही दिवसांचा पडलेला विरह या मुलांना सहन झाला नाही. सुट्ट्या संपल्या आणि लगेच शाळेत त्यांची पुन्हा भेट झाली. काही दिवसांचा पडलेल्या विरहामुळे प्रेम अधिकच घट्ट झाले होते. आपल्याला पुन्हा कोणी वेगळे करायला नको, म्हणून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला, तो ही शाळेतूनच पळून गेल्यानंतर जायचे कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता, म्हणून संगमनेर तालुक्यातीलच एका गावामध्ये त्यांच्या पाहुण्यांकडे एका झोपडीमध्ये त्यांनी तब्बल दोन महिने वास्तव्य केले, आणि याच काळात अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिली.
नक्की वाचा: संगमनेरात रंगला बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार…
“तू काळजी करू नको, आपण घरच्यांना सर्व सांगून टाकू, आपण लग्न करू, म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल” असा धीर त्या मुलाने पीडित मुलीला दिला. आणि जून महिन्यात मुलीच्या घरी पोहोचले. तेव्हा मुलीला होणाऱ्या मळमळीमुळे आईने चौकशी केली असता तिला रुग्णालयात नेले. तिथे खोटे वय सांगून उपचार केले. यावेळी पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर होती. मुलीच्या आई-वडिलांनी मुलाच्या आई-वडिलांना बोलून घेतले. सर्व प्रकार सांगितल्यानंतर पुणे जिल्ह्यात जाऊन दोघांचाही साध्या पद्धतीने विवाह करण्यात आला. हळूहळू पोटातील बाळ वाढत होते. शेवटी तेथील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तिला तिचे वय विचारले असता ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. आता तिला एक मुलगा झाला होता. डॉक्टरांनी तिला पाठीशी न घालता लगेच पोलीस ठाण्याची संपर्क केला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. बालविवाह कायद्याने गुन्हा असल्याने पीडित मुलीच्या फिर्यादीवरून या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.