Crime : संगमनेर: शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) माजी शहरप्रमुखाने भाजप (BJP) शहराध्यक्षाच्या कानशिलात लगावण्याची घटना संगमनेरात (Sangamner) घडली.
अवश्य वाचा: शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल
प्रशासकीय भवनाजवळ घडली घटना
विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ असल्याने प्रशासकीय भवनाजवळ एका चहाच्या टपरीवर भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले बसलेले असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी शहराप्रमुख अमर कतारी यांनी पाठीमागून येत काहीही न बोलता त्यांच्या कानशिलात लगावली. यावेळी गणपुले यांच्या हातात चहाचा पेला असल्याने त्यातील सगळा चहा त्याच्या कपड्यावर सांडला.
नक्की वाचा: एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ
पोलिसांना सापडत नसतील तर, आम्ही हजर करतो (Crime)
या घटनेनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता गणपुले थेट शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर काही वेळातच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनीही पोलीस ठाण्यात येवून दोषीला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
शहर पोलीस ठाण्यात श्रीराम गणपुले यांच्याकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही अधिकाऱ्यांशी बोलताना त्याचा उल्लेख केला आहे. यावेळी मंत्री विखे यांनी चिखली जळीत प्रकरणातील आरोपी शहरात खुलेआम फिरत असतानाही त्यांना अद्याप अटक का होत नाही, असा सवाल अधिकाऱ्यांना विचारला, पोलिसांना ते सापडत नसतील तर, आम्ही पकडून हजर करतो, असा इशाराही त्यांनी दिला.