Crime : नगर : सेफ्टी टँक चा खड्डा खांदल्याच्या कारणावरून नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात दोन गटात चाकू, दगड, लाकडी दांडक्याने हाणामारी (Beating) झाल्याची घटना घडली. मारहाणीत चौघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस (Police) ठाण्यात गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत.
नक्की वाचा: ‘उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही’- चंद्रशेखर बावनकुळे
खड्डा का केला? असे विचारल्याचा राग
शोभा कातोरे (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद नामदेव कातोरे, राजेंद्र नारायण लाळगे, सविता शरद कातोरे, श्रवण शरद कातोरे, विजय नारायण लाळगे, अनिता विजय लाळगे, सुनीता राजेंद्र लाळगे (सर्व रा. कामरगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा कातोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘शनिवारी (ता.२) सायंकाळी सहाच्या सुमारास संशयित आरोपी यांना आमच्या घराच्या शेजारी खड्डा का केला असे विचारले असता त्याचा त्यांना राग येऊन त्यांनी मला दगडाने व मुलाला चाकूने मारहाण करून जखमी केले.’
अवश्य वाचा: ५० लाखांच्या बिअर बाटल्यासहा ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
यांच्याविरूध्द गुन्हा दाखल (Crime)
सविता शरद कातोरे (वय 43) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण बबन कातोरे, बबन नामदेव कातोरे, रंजित बबन कातोरे, शोभा बबन कातोरे (सर्व रा. कामरगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता कातोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘राजेंद्र लाळगे यांच्या जागेत सेफ्टी टँकचा खड्डा खांदल्याच्या कारणावरून मला व माझ्या पतीला शनिवारी (ता. 2) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संशयित आरोपी यांनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. मी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकाँर्डिग करत असताना बबन कातोरे याने डोक्यात दगड फेकून मारला. मुलावर खोटा गुन्हा दाखल करून शिक्षण बंद करण्याची धमकी दिली’. अधिक तपास पोलीस करत आहेत.