Crime : खोटी माहिती प्रसारित; व्हॉटस्ॲप ग्रुपच्या सदस्यांवर गुन्हा दाखल

Crime : खोटी माहिती प्रसारित; व्हॉटस्ॲप ग्रुपच्या सदस्यांवर गुन्हा दाखल

0
Crime : खोटी माहिती प्रसारित; व्हॉटस्ॲप ग्रुपच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
Crime : खोटी माहिती प्रसारित; व्हॉटस्ॲप ग्रुपच्या सदस्यांवर गुन्हा दाखल

Crime : नगर : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) अनुषंगाने व्हॉट्सअपवरुन (WhatsApp) खोटी माहिती प्रसारित केल्याने जिल्हा ग्राहक सुरक्षा या व्हॉटस्अप ग्रुपच्या सदस्यांवर तोफखाना पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. 

नक्की वाचा : झाशीमध्ये मृत्यूतांडव! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू

मतदारांमध्ये खोटी माहिती प्रसारित

एका मोबाईल क्रमांकावरून मतदार केंद्रावर ज्याचे नाव यादीतून वगळली आहेत, म्हणजेच यादीत नावावर डिलीट शिक्का लागला आहे ते मतदार मतदान केंद्रावर फॉर्म क्र. १७ भरुन आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करुन शकणार आहेत, अशा आशयाचा संदेश व्हॉटस्अप ग्रुप वरून प्रसारित करण्यात आला होता. निवडणुकीमध्ये अशी कोणतीही तरतूद नसल्याने निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर परिणाम करण्याचे तसेच मतदान यंत्रणेवर ताण निर्माण करण्याच्या उद्देशाने मतदारांमध्ये खोटी माहिती प्रसारित केल्यामुळे मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विकास पांडूरंग पाटील यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : शेतकरी व नागरिकांनी आमदारांच्या फोटोला दुग्धाभिषक करत केले अनोखे स्वागत

खोटी माहिती प्रसारित न करण्याचे आवाहन (Crime)

 निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू असून निवडणूक प्रक्रियेबाबत कोणीही खोटी माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.