Crime : पारनेर: सुपा औद्योगिक वसाहतीत (Supa Industrial Estate) उद्योजकाला अमानुष मारहाण (Beating) झाली असून, मारहणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.
नक्की वाचा : तामिळनाडूतील खाजगी रुग्णालयाला आग;अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू
याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की,
गुरुवारी (ता.१२) सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान जखमी दिनेश प्रमोद ऊरमुडे (वय २४, रा. भोयरे पठार, ता. नगर) यास सुपा औद्योगिक वसाहतीत सहा व्यक्तींनी अमानुष मारहाण केली. सदर व्यक्तीस पाच-सात जण लाथा बुक्क्या, लाकडी दांडक्यानी मारहाण करताना सीसीटीव्हीत दिसत आहे.
अवश्य वाचा : ‘महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा वीज महाग’-जयंत पाटील
सदर व्यक्ती गंभीर जखमी (Crime)
या मारहाणीत सदर व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत प्रमोद ऊरमुडे यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुपा पोलिसांनी ऊरमुरे यांच्या फिर्यादीवरुन सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जेजोट पुढील तपास करत आहेत.