Crime : नगर : महावितरणमध्ये (Mahavitaran) खासगी कंपनी मार्फत बाह्य स्रोत यंत्रचालक म्हणून नियुक्ती आदेश देण्यासाठी तब्बल १५ हजारांची लाच घेताना दोघे लाचलुचपत विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत कोतवाली पोलीस (Police) ठाण्यात तिघा विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्हा हा गोहत्या मुक्त करण्यासाठी सहकार्य राहील – संग्राम जगताप
असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव
विशाल विष्णू देवतरसे, (वय-३२, धंदा-खाजगी नोकरी, लिपिक, जी.के. एंटरप्राइजेस, एम.आर. ट्रेड सेंटर, वाडिया पार्क, अहिल्यानगर, रा.घर नं. 272, राजेश्वर सोसायटी, मोहिनी नगर, केडगाव), विनोद बाबासाहेब दळवी, (वय- २८ लिपिक, जी.के. एंटरप्राइजेस, एम.आर. ट्रेड सेंटर, वाडिया पार्क, अहिल्यानगर रा.दळवी निवास, राम मंदिरामागे, भूषणनगर, केडगाव), अंबादास मनोहर कदम, (प्रोप्रायटर जी.के. इंटरप्राईजेस, एम.आर. ट्रेड सेंटर, वाडिया पार्क, अहिल्यानगर), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
अवश्य वाचा : महानगरपालिकेच्या १०० बेडच्या अद्ययावत रुग्णालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात
कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल (Crime)
तक्रारदार जुलै २०२१ पासून खासगी कंपनी मार्फत बाह्य स्त्रोत यंत्रचालक म्हणून 33/11 के.व्ही. खडका उपकेंद्र, कक्ष प्रवरा संगम, ता. नेवासा या ठिकाणी महावितरण कंपनी अंतर्गत कामकाज करत होते. ३३/११ के.व्ही. खडका उपकेंद्र, कक्ष प्रवरा संगम, ता. नेवासा या ठिकाणी कंपनीने ता. ५ डिसेंबर २०२४ पासून बाह्य स्त्रोत कर्मचारी भरण्याचे कॉन्ट्रॅक्ट जी. के. एंटरप्राइजेस, अहिल्यानगर चे प्रोप्रायटर अंबादास कदम यांना दिले होते. तक्रारदार बाह्य स्त्रोत यंत्र चालक म्हणून नियुक्तीचा आदेश घेण्याकरिता जी. के. एंटरप्राईजेस कार्यालय, अहिल्यानगर येथे गेले असता कार्यालयातील खासगी कर्मचारी प्रदीप उर्फ विशाल देवतरसे व विनोद दळवी यांनी तक्रारदार यांना सांगितले की, नियुक्ती आदेश देण्याकरिता अकरा महिन्याचे एकत्रित पंधरा हजार रुपये घेतल्याशिवाय नियुक्ती आदेश देऊ नका, असे कदम यांनी सांगितले आहे. याबाबत तक्रारदार यांनी १३ डिसेंबर रोजी लाचलुच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अंबादास कदम यांचे करीता पंचा समक्ष १५ हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.