Crime : बोल्हेगाव- नागापूर परिसरातील वाढलेल्या गुन्हेगारीमुळे या परिसराचा बिहार झाला – दत्ता सप्रे  

Crime : बोल्हेगाव- नागापूर परिसरातील वाढलेल्या गुन्हेगारीमुळे या परिसराचा बिहार झाला - दत्ता सप्रे  

0
Crime : बोल्हेगाव- नागापूर परिसरातील वाढलेल्या गुन्हेगारीमुळे या परिसराचा बिहार झाला - दत्ता सप्रे  
Crime : बोल्हेगाव- नागापूर परिसरातील वाढलेल्या गुन्हेगारीमुळे या परिसराचा बिहार झाला - दत्ता सप्रे  

Crime : नगर : अहिल्यानगर शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा बोल्हेगाव-नागापूर (Bolhegaon-Nagapur) परिसरातील वाढलेल्या गुन्हेगारीमुळे (Crime) या परिसराचा बिहार झाला आहे. या भागातील गुन्हेगारी पोलिसांनी (Police) तातडीने मोडून काढावी अन्यथा रस्त्यावर उतरून नागरिकांसह तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा स्थानिक नेते दत्ता सप्रे (Datta Sapre) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला.

अवश्य वाचा : शेवगाव येथील मंदिर सेवेकऱ्याच्या हत्येची उकल

पत्रकार परिषदेमध्ये दत्ता सप्रे म्हटले आहे की,

बोल्हेगाव-नागापूर भागातील वाढलेल्या गुन्हेगारी बाबत संताप व्यक्त करत पोलिसांच्या अर्थपूर्ण निष्क्रिय भूमिकेवर जोरदार टीकास्त्र केले. बोल्हेगाव-नागापूर, एमआयडीसी भागात सध्या चौकाचौकात गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या हप्ते वसुली, महिला मुलींची छेडछाड, बिंगो मटक्याचे अड्डे चालवित आहे. या भागातील महिला तरुणी सर्वसामान्य नागरिक दुकानदार व्यापारी कुणीही सुरक्षित राहिला नाही. सर्व सामान्य माणसांना दादागिरी केली जात आहे. जीव घेणे हल्ले करून खुनाचे प्रयत्न होत आहे तर गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे पाप एमआयडीसी व तोफखाना पोलीस करत आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना तडीपार करण्याची मागणी (Crime)

 जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या भागातील ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अशांना तातडीने तडीपार करावे व एमआयडीसी खंडणी मुक्त व हप्ते वसुली मुक्त करावी. बोल्हेगाव नागापूर परिसरात रात्रीची गस्त वाढून चौकाचौकात बसणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा या भागातील रहिवासी भागात सुरू असलेला वेश्याव्यवसाय बंद करण्यात यावा, अशी मागणी दत्ता पाटील सप्रे यांनी केली आहे. या सर्व गुन्हेगारी कृत्याकडे एक जबाबदार लोकप्रतिनिधी व नागरिक म्हणून शांतपणे पाहणे शक्य नाही आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने या भागातील नागरिकांच्या सुरक्षेची आम्हाला काळजी आहे चौकाचौकात बिंगोचे व मटक्याचे अड्डे सुरू आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बोल्हेगाव, नागापूर, एमआयडीसी भागातील गुन्हेगारी सक्तीने मोडून काढावी व या भागाचा बिहार होण्यापासून वाचवावे अन्यथा आम्हाला नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही दत्ता पाटील सप्रे यांनी दिला.