Crime : श्रीगोंद्यात शेतकरी दांपत्याला मारहाण; गुन्हा दाखल

Crime : श्रीगोंद्यात शेतकरी दांपत्याला मारहाण; गुन्हा दाखल

0
Crime : श्रीगोंद्यात शेतकरी दांपत्याला मारहाण; गुन्हा दाखल
Crime : श्रीगोंद्यात शेतकरी दांपत्याला मारहाण; गुन्हा दाखल

Crime : नगर : श्रीगोंदे तालुक्यातील होलेवाडी येथे कांद्याच्या चाळीचे नुकसान करून शेतकरी दांपत्याला मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून (Complaint) चौघांवर श्रीगोंदा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘कोणतही डिपॉझिट घेऊ नका’;पुणे महानगरपालिकेची खासगी रुग्णालयांना नोटीस

कांदा चाळीचे लोखंडी पोल पाडून टाकले

नवनाथ दरेकर, रमेश दरेकर, सतीश दरेकर, गणेश दरेकर (सर्व रा. हिरडगाव ता. श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. फिर्यादी ह्या त्यांच्या शेतात बांधलेल्या नवीन कांद्याच्या चाळीला पाणी मारत असताना तेथे नवनाथ दरेकर व इतर तिघे आले. त्यांनी कांदा चाळीचे लोखंडी पोल पाडून टाकले.

अवश्य वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार

शिवागाळ करून मारहाण (Crime)

फिर्यादी यांनी लोखंडी पोल का पाडले? असे विचारले असता त्याचा राग आल्याने त्यांनी शिवागाळ करून मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता फिर्यादीचे पती तेथे आले त्यांनाही नवनाथ दरेकर, रमेश दरेकर, सतीश दरेकर यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.