Crime : नगर : भागीदारीत सुरू केलेल्या पाणी बॉटल प्लॅन्टमध्ये प्लंबिंग व्यावसायिकाची फसवणूक झाली. तसेच त्यांना जातीवाचक शिवीगाळ (Caste Abuse) व मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. नितीनकुमार भगवानराव दिपके (वय ३१, मुळ रा. जवळा बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली, हल्ली रा. कल्याण रस्ता, अहिल्यानगर) असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी रविवारी (ता. १३) सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य विजय शिंदे व विजय शिवाजी शिंदे (दोघे रा. नालेगाव, अहिल्यानगर) अशी गुन्हा (Crime) दाखल झालेल्यांची नावे आहेत.
नक्की वाचा : मोठी बातमी! संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला
प्लॅन्टवरच दोघांमध्ये झाले वाद
दिपके हे अहिल्यानगर मध्ये प्लंबिंगचे काम करतात. १ एप्रिल रोजी त्यांनी आदित्य शिंदे व विजय शिंदे यांच्या सोबत आदित्य इंडस्ट्रीज नावाने पाणी बॉटल प्लॅन्ट सुरू केला. या व्यवसायात दिपके यांनी तब्बल २८ लाख रूपयांची गुंतवणूक केली होती आणि ५०-५० टक्के भागीदारीवर हे काम सुरू होते. तथापि, ७ मार्च रोजी प्लॅन्टवरच झालेल्या वादात दोन्ही भागीदारांनी दिपके यांना तुझी लायकी नसताना तुला पार्टनर घेतले, तुझ्या जातीला गावाबाहेर ठेवू असे म्हणत अपमानित करून प्लॅन्टच्या बाहेर काढून दिले.
अवश्य वाचा : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!
दिपके यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण (Crime)
२९ मार्च २०२५ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास माधवनगर येथून रूमकडे जात असताना दिपके यांची दुचाकी आदित्य शिंदे व विजय शिंदे यांनी अडवली. त्यांनी दिपके यांना जातीवाचक शिवीगाळ करत, लाकडी दांडा व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच येथे दिसलास तर तलवारीने मारून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली.घटनेनंतर दिपके यांनी त्यांचे मित्र सुरज पंचमुख याच्या मदतीने आश्रय घेतला आणि दुसर्या दिवशी उपचारासाठी जिल्हा रूग्णालय येथे दाखल झाले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर १३ एप्रिल रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती अधिक तपास करीत आहेत.