Crime : नगर : परराज्यातून विक्रीसाठी आणलेला गांजा राहाता तालुक्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Local crime branch) ताब्यात घेतला आहे. तर एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. तर तिघांविरुद्ध राहाता पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ
संशयित आरोपींची नावे
संशयित आरोपीकडून साडेतेरा किलो गांजा असा १० लाख ८१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अरुण मोतीलाल विश्वकर्मा (वय ४५, रा.गितराम सोसायटी, दत्तमंदीर, नाशिक रोड, नाशिक), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर नितीन जाधव (रा.निमगाव कोऱ्हाळे, शिर्डी, ता.राहाता), साईनाथ गायकवाड (रा.शिर्डी पूर्ण नाव माहित नाही), जयराम (पूर्ण नाव माहित नाही (पसार) ते गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?
ओडिसा राज्यातून विक्रीसाठी गांजा (Crime)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार राज्य बंदी असलेला गांजा ओडिसा राज्यातून विक्रीसाठी चारचाकी मधून घेऊन येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून मुद्देमाल ताब्यात घेतला. मात्र, त्यातील तिघे संशयित पसार झाले. त्यांचा शोध पोलीस घेत आहे. ही कारवाई शिर्डी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार धिरज अभंग, अनिल गवांदे, प्रभाकर शिरसाठ, एस. एन. अनारसे यांच्या पथकाने केली.