Crime : नगर : जामखेड परिसरात स्वस्तात सोने (Gold) देण्याचे आमिष दाखवून दहा लाखांचा मुद्देमाल लुटणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Local Crime Branch) ताब्यात घेतले आहे. याबाबत जामखेड पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
आरोपींचे नावे
सोन्या शिवाजी काळे (वय २८), अभित्या शिवाजी काळे (वय ३२, दोन्ही रा.सरफडोह, ता.करमाळा, जि.सोलापूर), शुभम रामचंद्र पवार (वय १८, रा.सरदवाडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर) असे ताब्यात घेतले आहे. आरोपींकडे चौकशी केली असता हा गुन्हा विकास काज्या काळे, जरेणी विकास काळे, लालासाहेब काज्या काळे, किरण काज्या काळे (रा. पोंदवडी, ता.करमाळा, जि.सोलापूर), वनिता रामचंद्र पवार (रा.सरदवाडी, ता.जामखेड), दिक्षा रामचंद्र पवार (रा.सरदवाडी, ता.जामखेड), सुनिल शिवाजी काळे (रा.सरफडोह, ता.करमाळा, जि.सोलापूर), रेश्मा सुनिल काळे (सर्व पसार, रा.सरफडोह, ता.करमाळा, जि.सोलापूर) यांनी मिळून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई (Crime)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश लोंढे, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, मनोज लातुरकर, सुनील मालणकर, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, अरूण मोरे यांच्या पथकाने केली.