Crime : बियाणांची जादा दराने विक्री; गुन्हा दाखल

Crime : बियाणांची जादा दराने विक्री; गुन्हा दाखल

0
Crime : बियाणांची जादा दराने विक्री; गुन्हा दाखल
Crime : बियाणांची जादा दराने विक्री; गुन्हा दाखल

Crime : नगर : पाथर्डी (Pathardi) तालुक्यात कपाशी बियाणाची जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानावर कृषी विभागाच्या (Agriculture Department) पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. देविदास आनंदराव फुंदे असे गुन्हा (Crime) दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. तसेच बियाण्यांच्या विक्रीसाठी आवश्यक असलेला अधिकृत परवाना त्यांच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांच्या साठा पुस्तकातही त्रुटी आढळल्या आहेत.

नक्की वाचा : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमाफी;एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

संबंधित दुकानावर छापा टाकून कारवाई

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांना पाथर्डी तालुक्यात कपाशी बियाण्यांची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली. यानंतर त्यांनी पाथर्डी बाजार परिसरात प्राथमिक चौकशी केली असता बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यानुसार बनावट ग्राहक बनून कृषी विभागाच्या पथकाने संबंधित दुकानावर छापा टाकून कारवाई केली. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी

शेतकऱ्यांनी खरीप लागवडीसाठी घाई करू नये (Crime)

शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या लागवडीसाठी घाई करू नये: सुधाकर बोराळे
शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या लागवडीसाठी घाई करू नये. तसेच खते व बियाणे खरेदी करताना पक्के बिले घ्यावेत. गैरप्रकार आढळल्यास तत्काळ नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करावा. बाजारात खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवाना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.