Crime : नगर : अहिल्यानगर शहरातील जीपीओ चौकात ट्राफिक नियमन (Traffic Regulation) करत असताना गैर कायद्याची मंडळी जमवून तक्रारदार यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या यांच्यासह पाच ते सहा जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) सोमवारी (ता.१६) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?; वारकर्यांचा सरकारला संतप्त सवाल
पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल
निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या जिल्हाध्यक्षा शीतल गोरे यांच्यासह पाच ते सहा जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर वाहतूक शाखेच्या पोलीस जयश्री सुद्रिक वय ३४, रा. समर्थनगर, अहिल्यानगर) यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल झाला आहे.
अवश्य वाचा : पोलिसाकडून स्वस्तात प्लॉट देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक
व्हिडीओ काडून सोशल मीडियावर प्रसारित (Crime)
फिर्यादी ह्या २६ मे रोजी जीपीओ चौकात कर्तव्य बजावत असताना निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या जिल्हाध्यक्षा शीतल गौरी यांच्यासह पाच ते सहा कार्यकर्ते तिथे आले. फिर्यादी यांना म्हणत तुम्ही वाहतूक नियमाचे काम व्यवस्थित करत नाही, असे म्हणत त्यांच्याशी वाद घालत हुज्जत घातली. तसेच बदनामी करण्याच्या उद्देशाने व्हिडीओ काडून सोशल मीडियावर प्रसारित करून पोलीस प्रशासनाची प्रतिमा जनमाणसात मालिन केली. ही घटना सहन न झालयाने फिर्यादी यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्यांचा प्रयत्न केला. त्यांच्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक फौजदार पी. बनकर हे करत आहेत.