Crime : कान्होबा देवस्थान वाद प्रकरण; दोन्ही गटातील तब्बल ६० जणांवर गुन्हे दाखल

Crime : कान्होबा देवस्थान वाद प्रकरण; दोन्ही गटातील तब्बल ६० जणांवर गुन्हे दाखल

0
Crime : कान्होबा देवस्थान वाद प्रकरण; दोन्ही गटातील तब्बल ६० जणांवर गुन्हे दाखल
Crime : कान्होबा देवस्थान वाद प्रकरण; दोन्ही गटातील तब्बल ६० जणांवर गुन्हे दाखल

Crime : पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा (Jawakhede Khalsa) गावातील कान्होबा देवस्थान येथे पूजा-अर्चनेच्या मुद्द्यावरून दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन मोठा तणाव निर्माण झाल्याची घटना १९ जून रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या वादानंतर दोन्ही गटांनी पोलीस (Police) ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून एकूण ६० जणांविरुद्ध गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत.

नक्की वाचा : करंजी घाटात विचित्र अपघात; ट्रकची एकाच वेळी पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी

पूजा करण्यासाठी गेल्यावर विरोध

या प्रकरणात पहिल्या गटातील २८ आरोपींविरुद्ध, तर दुसऱ्या गटातील ३२ आरोपींविरुद्ध, धार्मिक भावना दुखावणे, जबरदस्तीने पूजा करण्यास अडथळा आणणे, मारहाण, शिवीगाळ, धमकी, तसेच शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रारंभी, गावातील काही ग्रामस्थांनी देवस्थानात पूजा करण्यासाठी गेल्यावर विरोध करणाऱ्या व्यक्तींनी मारहाण केली, मंदिराला कुलूप लावले, असा आरोप करत तक्रार दिली.

अवश्य वाचा : अनधिकृत खतांच्या साठ्यावर कृषी विभागाचा छापा

पुजाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप (Crime)

तर दुसऱ्या गटाने पूजा करण्याच्या नावाखाली जबरदस्ती, गाभाऱ्यात घुसखोरी व पुजाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या दोन्ही तक्रारींनंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले गेले. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये करत आहेत. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.