Crime : भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीत ७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

Crime : भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीत ७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

0
Crime : भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीत ७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल
Crime : भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीत ७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

Crime : नगर : भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीच्या गुलाबनगर, पाईपलाईन रस्ता, अहिल्यानगर येथील शाखेत तब्बल ७ लाख ११ हजार ६६६ रूपयांचा अपहार (Embezzlement) झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी चार कर्मचार्‍यांविरोधात गुरूवारी (ता.१९) तोफखाना पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘आळंदीमध्ये कत्तलखाना होऊ देणार नाही’ – देवेंद्र फडणवीस

कर्जदारांकडून घेतलेली रक्कम कार्यालयात भरली नाही

या प्रकरणी दीपक कारभारी बाणेदार (वय ३२ रा. गुलाबनगर, अहिल्यानगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाणेदार हे कंपनीमध्ये ब्रँच क्रेडिट मॅनेजर या पदावर कार्यरत असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत चार कर्मचार्‍यांनी कर्जदार महिलांकडून घेतलेली रक्कम कार्यालयात न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे नमूद केले आहे. फिर्यादीवरून कैलास दिगंबर कोल्हे (वय २८, रा. भाहेगाव, वाजेगाव, ता. जि. नांदेड), सचिन सुरेश बेंबळे (वय ३१, रा. करजगाव, ता. नेवासा), दत्तात्रय अशोक कदम (वय २८, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा), तेजस सुनील बनसोडे (रा. हनुमंतगाव, ता. राहाता) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : माळीवाडा बस स्थानकात प्रवाशांची गैरसोय; प्रशासनाचे दुर्लक्ष

४७ महिला कर्जदारांकडूची रक्कम केली गहाळ (Crime)

संशयित चौघांनी १ सप्टेंबर २०२२ ते १० मार्च २०२५ या कालावधीत मिळून एकूण ४७ महिला कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम कार्यालयात न भरता गहाळ केली. यातील कोल्हे याने एकट्याने ३ लाख ६८ हजार ८० रूपये, बेंबळे याने १ लाख ६६ हजार ३३९ रूपये, कदम याने ४६ हजार २८७ रूपये, तर बनसोडे याने १ लाख ३२ हजार ९६० रूपये अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदर प्रकरणी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण तपास करीत आहेत.